देशाच्या विकासासाठी मोदींचं पाऊल; आता 'भारत छोडो' अभियान करणार जलद

देशाच्या विकासासाठी मोदींचं पाऊल; आता 'भारत छोडो' अभियान करणार जलद

यावेळी आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कामाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (Rashtriya Swachhta Kendra) यांच आज उद्घाटन केलं. त्यांनी हे सेंटर महात्मा गांधी यांना समर्पित केलं आहे.

पीएम मोदींनी  राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची (आरएसके) सर्वात पहिली घोषणा 10 एप्रिल 2017 रोजी गांधीच्या चंपारण्य 'सत्याग्रहा'ला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या दिवशी केली होती. या केंद्रात भावी पिढीला स्वच्छ भारत मिशनच्या प्रवासाबाबत माहिती दिली. गंगा नदीप्रमाणे देशातील इतर नद्याही प्रदूषणमुक्त करायच्या आहेत, असं मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कामाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. स्वच्छता हे गांधींच्या आंदोलनाचं मोठं माध्यम होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाला कमकुवक बनवणाऱ्या दुर्गुणांनी भारत सोडावं, यापुढे अजून काय चांगलं होऊ शकतं. याच विचारासह गेल्या 6 वर्षांपासून देशात एक व्यापक भारत छोडो अभियान सुरू आहे. गरीबी-भारत छोडो

दुर्गुणांनी भारत सोडा.

उघड्यावर शौचालयाला जाण्याची परिस्थिती - भारत छोडो

पाण्यासाठी वणवण भटकणं - भारत छोडो

देशातील भारत छोडो हे अभियान अधिक जलद करण्यात येणार आहे. भारताचा विकास करण्यासाठी आणि देशातील कमकुवत करणाऱ्या दुर्गुणांना देशाबाहेर काढण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून भारत छोडो अभियान महत्त्वपूर्ण असून येत्या काळात त्याला अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या