पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, वाराणशीत शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, वाराणशीत शक्तिप्रदर्शन

या निवडणुकीतही पंतप्रधान दोन जागांवरून लढतील असं बोललं जात होतं मात्र ते दोन जागांवरून न लढता फक्त वाराणशीतूनच लढणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 7 एप्रिल : पंतप्रधान मोदी 26 एप्रिल रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 25 तारखेलाच मोदी वाराणसीत दाखल होतील. उमेदवारी अर्ज भरताना ते भव्य रोड शोही करणार आहेत. 2014 च्या साली मोदी वाराणसीतून निवडून आले होते. या निवडणुकीतही पंतप्रधान दोन जागांवरून लढतील असं बोललं जात होतं मात्र ते दोन जागांवरून न लढता फक्त वाराणशीतूनच लढणार आहे.

2014 च्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेला रोड शो चांगलाच गाजला होता. त्याची चर्चाही देशभर झाली होती.

38 देशांमध्ये प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक

‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या सिनेमाबद्दल नानाविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी सिनेमाची टीम बायोपिक एक दोन नव्हे तर तब्बल ३८ देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात यूएस, यूके, कनाडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमात मोदींच्या बालपणापासून पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

सिनेमाचे निर्माते आणि वितरकांपैकी एक निर्माते आनंद पंडित यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातील अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळेच आम्ही फक्त भारतात नाही तर जगभरात ३८ देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘भारतात हा सिनेमा १७०० स्क्रिनवर दाखवण्यात येईल. तर जगभरात हा सिनेमा ६०० स्क्रिनवर दाखवण्यात येईल.’ पीएम नरेंद्र मोदी हा बायोपिक हिंदीशिवाय तेलगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या