पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा

मोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2018 05:49 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा

कर्नाटक, 30 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता तापायला लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्यापासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी एकूण 65 सभा घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1मे पासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत. चिक्कोडी, बेल्लारी, रायचूर, विजापूर, बंगळुरूमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत. मोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय. यामध्ये मोदींच्या १५, अमित शहांच्या ३० आणि योगींच्या २० सभा असतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी योगी अधिक सभा घेतील, जेणेकरून हिंदुत्वाचा मुद्दा मतदारांपर्यंत पोहचवता येईल, असं भाजपमधल्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

भाजपची रणनीती

- मोदी, शहा, योगींच्या एकूण 65 सभा

- मोदी एकूण 15 सभा घेणार

Loading...

- अमित शहांच्या सभांचा आकडा 30

- योगी आदित्यनाथ 20 सभा घेणार

- 1 मे रोजी मोदी कर्नाटक दौऱ्यावर

- चिक्कोडी, बेल्लारी, रायचूर, विजापूर, बंगळुरूमध्ये मोदींची सभा

- गुजरातप्रमाणं सुरुवातीपासून मोदींचा सहभाग नाही

- कर्नाटकात मोदींपेक्षा अमित शहांच्या सभा अधिक

तर दुसरीकडे काँग्रेसही एकूण ४० स्टार प्रचारकांना उतरवणार आहे. राहुल आणि सोनिया गांधी, आणि डॉ. मनमोहन सिंगही कर्नाटकात प्रचार करणार आहेत. पण काँग्रेसकडून या दौऱ्याबाबतच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत तर दुसरीकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष लागलय ते बदामी या मतदारसंघावर..या मतदारसंघांमधून विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरोधात बी. श्रीरामलु भाजपकडून, तर हणमंत माविनमरद हे जनता दल सेक्युलर कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...