Home /News /national /

CAAच्या नाहीतर पाकिस्तानच्या विरोधात मोर्चा काढा, मोदींचा काँग्रेसवर प्रहार

CAAच्या नाहीतर पाकिस्तानच्या विरोधात मोर्चा काढा, मोदींचा काँग्रेसवर प्रहार

Jodhpur: Prime Minister Narendra Modi addresses an election rally ahead of the state assembly elections, in Jodhpur, Dec. 03, 2018. (PTI Photo)(PTI12_3_2018_000116B)

Jodhpur: Prime Minister Narendra Modi addresses an election rally ahead of the state assembly elections, in Jodhpur, Dec. 03, 2018. (PTI Photo)(PTI12_3_2018_000116B)

'या लोकांवर पाकिस्तानने अत्याचार केले मात्र त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्यांची तोंड या अत्याचाराविरुद्ध बंद आहेत. खरं तर त्यांनी पाकिस्तानचे कारनामे जगासमोर उघड करायला पाहिजे होते.'

    नवी दिल्ली 02 जानेवारी : CAAला देशभर विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आता CAAच्या समर्थनासाठी जोरदार सरसावले आहेत. मोदींनी ट्विटरवरून समर्थनासाठी जाहीर आवाहन केलं होतं. त्यांनी समर्थनाचे काही व्हिडीओही ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी आज काँग्रेससहीत विरोधीपक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कर्नाटकातल्या तुमकूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार कोरडे ओढले. पंतप्रधान म्हणाले, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरुद्ध काँग्रेस देशभर मोर्चे काढत आहे. CAA, कलम 370 आणि अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. पंतप्रधान म्हणाले, आम्हाला वारशात अनेक समस्या मिळाल्या आहेत. त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंचा धार्मिक आधारावरून छळ होतोय. त्यामुळे आपली जीव वाचविण्यासाठी सगळे हिंदू भारतात शरण घेण्यासाठी आले आहेत. त्यांना मदत करण्याचं सोडून त्यांच्याविरूद्ध मोर्चे काढले जात आहेत. या लोकांवर पाकिस्तानने अत्याचार केले मात्र त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्यांची तोंड या अत्याचाराविरुद्ध बंद आहेत. खरं तर त्यांनी पाकिस्तानचे कारनामे जगासमोर उघड करायला पाहिजे होते. मात्र तसे न करता ते व्होट बँकेचं राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या एका भक्ताने नव्या वर्षानिमित्त (New Year) आपली एक मोठी इच्छा पूर्ण व्हावी, अशी मनोकामना Twitter वरून व्यक्त केली. आपण पंतप्रधानांचे चाहते आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला नवीन वर्षाची भेट (New Year's gift) मिळेल का, अशी विचारणा करणाऱ्या या Twitter यूजरला 1 जानेवारी 2020 च्या संध्याकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याची मनोकामना साक्षात पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली. या इच्छापूर्तीची पूर्ण कहाणी अशी. अंकित दुबे नावाच्या Twitter युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून नवीन वर्षात आपली इच्छा पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आदरणीय पंतप्रधान, मी तुमचा मोठा चाहता आहे, प्रशंसक आहे. मला नव्या वर्षाची तुमच्याकडून एक भेट मिळेल का? मी तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही मला Twitter वर फॉलो बॅक कराल का? अशी विनंती अंकितने केली आणि पंतप्रधानांनी त्याला फॉलो करत त्याची इच्छा पूर्ण केली.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या