मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO: उद्घाटनानंतर बोगद्यामध्ये पडलेल्या कचऱ्यावर गेली पंतप्रधानांची नजर; मग मोदींनी काय केलं पाहा

VIDEO: उद्घाटनानंतर बोगद्यामध्ये पडलेल्या कचऱ्यावर गेली पंतप्रधानांची नजर; मग मोदींनी काय केलं पाहा

बोगद्यात केलेल्या कलाकृतीची पाहणी करत असताना पंतप्रधानांना आसपास काही कचरा पडल्याचं दिसलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हा कचरा उचलू लागले (Prime Minister Narendra Modi picked up litter)

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 19 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच प्रगती मैदान इथे इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचं आणि 5 अंडरपासचं उद्घाटन केलं. यातून वाहतूक कोंडीतून दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हा बोगदा सुरू झाल्याने रिंगरोडमार्गे मध्य दिल्लीत येणं सोपे होणार आहे. यासह लोक पूर्व दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद येथून इंडिया गेट आणि मध्य दिल्लीच्या इतर भागांमध्ये सहज पोहोचू शकतात. पंतप्रधान मोदींनी या बोगद्यात केलेल्या कलाकृतीची जोरदार प्रशंसा केली. याशिवाय सध्या मोदींचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. Agnipath Scheme : राहुल गांधींनी पंतप्रधानांना लगावला 'माफीवीर'चा टोला, म्हणाले... बोगद्यात केलेल्या कलाकृतीची पाहणी करत असताना पंतप्रधानांना आसपास काही कचरा पडल्याचं दिसलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हा कचरा उचलू लागले (Prime Minister Narendra Modi picked up litter). यानंतर काही अंतर चालताच त्यांना बाजूलाच एक पाण्याची बाटली पडलेली दिसली. पंतप्रधानांने ही बाटलीही उचलली आणि कचऱा पेटीत टाकली. याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. ३१ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदींची स्वच्छतेबाबतची जागरूकता आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येतं. दरम्यान या अतिशय अतिशय खास प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, की अनेक दशकांपूर्वी, भारताची प्रगती, भारतीयांची ताकद, भारताची उत्पादने, आपली संस्कृती दाखवण्यासाठी प्रगती मैदान उभारण्यात आलेलं. त्यानंतर भारत बदलला, भारताची क्षमता बदलली, गरजा अनेक पटींनी वाढल्या, पण प्रगती मैदानाची फारशी प्रगती झाली नाही. PM Narendra Modi Blog : माझ्यात जे चांगले आहे ते... आईच्या वाढदिवशी मोदींनी लिहिली गौरवगाथा पुढे पंतप्रधान म्हणाले, 'गेल्या 8 वर्षांत आम्ही दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. गेल्या 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवा 193 किलोमीटरवरून 400 किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. पंतप्रधान म्हणाले की गेल्या वर्षी मला संरक्षण संकुलाचं उद्घाटन करण्याची संधीही मिळाली होती. अनेक चांगल्या गोष्टी, चांगल्या हेतूने केलेल्या गोष्टी राजकारणाच्या रंगात अडकतात हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे.
First published:

पुढील बातम्या