नवी दिल्ली, 02 मार्च : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनो भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. जिथं जॉर्जिया यांनी सर्वांसमोर मोदींचं भरभरून कौतुक केलं. त्या मोदींबाबत असं काही म्हणाल्या की मोदीही गालातल्या गालात हसले. त्यांच्या चेहऱ्यावरील कळीच खुलली. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
रायसीना डायलॉगचे 8 वे पर्व आजपासून दिल्लीत सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतात आल्या आहेत. गुरुवारी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. जिथं जॉर्जिया मोदींबाबत बोलल्या.
रोडवरील सँडविच ते टपरीचा चहा, फॉरेन अधिकारी-नेत्यांचा इंडियन स्ट्रिट फूडवर ताव; म्हणाले...
पीएम जॉर्जिया म्हणाल्या, "मोदी जगातील सर्व नेत्यांपैकी प्रिय नेते आहेत आणि ते किती मोठे नेते आहेत हे प्रत्यक्षातही सिद्ध झालं आहे. यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन"
जॉर्जिया ज्यावेळी मोदींचं कौतुक करत होत्या तेव्हा मोदीही त्यांच्याकडे पाहत होते. जॉर्जिया यांच्याकडून आपली प्रशंसा ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.
#WATCH | ...(PM Modi) is the most loved one of all (leaders) around the world. This is really proven that he has been a major leader and congratulations for that: Italian PM Giorgia Meloni pic.twitter.com/DF2ohzicqu
— ANI (@ANI) March 2, 2023
दरम्यान मोदींनी भारत आणि इटलीदरम्यानच्या स्टार्टअप संदर्भातील घोषणा केली. PM मोदी म्हणाले, आमच्यात 75 वर्षांपासून राजनैतिक संबंध आहेत. पण आजपर्यंत संरक्षण संबंध नव्हते. आज आपण याचीही सुरुवात करत आहोत. याशिवाय नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, IT, TV, सेमीकंडक्टर आणि अंतराळ या विषयांवर दोन्ही देश एकत्र काम करतील"
कुणी सेलिब्रिटी नाही सर्वसामान्यच आहेत, तरी 80 वर्षीय आजोबांसोबत सेल्फीसाठी लोक उतावळे कारण...
रायसीना डायलॉग हा 2 ते 4 मार्च असा तीन दिवसीय कार्यक्रम आहे. यामध्ये 100 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जेव्हा भारत G-20 चे अध्यक्षपद आणि यजमान आहे, अशावेळी रायसीना संवाद होत आहे. त्यामुळे ती महत्त्वाची बाब मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, PM Narendra Modi