NaMo Vs RaGa : ट्विटरवरून मोदींचा कौतुकाचा वर्षाव, कारण निवडणुका जवळ आल्या!

NaMo Vs RaGa : ट्विटरवरून  मोदींचा कौतुकाचा वर्षाव, कारण निवडणुका जवळ आल्या!

निवडणुका जवळ येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर आणखी सक्रिय झाले असून लोकांच्या सूचनांची थेट दखल घेत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 31 डिसेंबर : सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचं स्थान अगदी वरचं आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सगळ्या माध्यमातून ते कायम सक्रिय असतात. मात्र आता निवडणुका जवळ येत असल्याने पंतप्रधान आणखी सक्रिय झाले असून लोकांच्या सूचनांची थेट दखल घेत आहेत.

2018 हे वर्ष संपत असताना शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी अनेकांना आपल्या ट्विटर हॅण्डलवरून थेट उत्तर दिलीत. कुणाचं कौतुक केलं तर कुणाचे आभार मानले, तर कुणाला शुभेच्छा दिल्या आणि काही जणांना सूचनाही केल्या.

2018 च्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंतप्रधान इशा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात कोयंबतूरला गेले होते. तेव्हा त्यांनी गळ्यात एक उपरणं घातलं होतं.

त्यावर आदियोगीचं छायचित्र होतं. एका तरुणीला ते एवढं आवडलं की तिने ट्विटरवरून ते भेट म्हणून मिळेल का अशी विनंती पंतप्रधानांना केली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी ते उपरणं तिला भेट म्हणून पाठवून दिलं होतं. त्याची चर्चाही सोशल मीडियावर बरिच झाली होती.

ट्विटरवर पंतप्रधानांचे चाडेचार कोटी फॉलोअर्स आहे. तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामरच्या त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही काही कोटींमध्ये आहेत. सोशल मीडिया हे संपर्काचं मुख्य साधण असल्यान पंतप्रधान त्याचा पुरेपूर वापर करत असतात. 2014 ची निवडणुक ही जशी मैदानावर लढली गेली तशीच ती सोशल मीडियावर लढली गेली. 2019 मध्येही सोशल मीडियावर प्रचाराचा मोठा जोर राहणार आहे.

जनमत तयार करणं, ते घडवणं, प्रतिमा तयार करणं, त्याचं संवर्धन करणं हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्याप्रकारे आणि कमीत कमी खर्चात करता येतं. त्यामुळं पंतप्रधान त्याचा उपयोग कायम करत असतात. सोशल मीडियावर तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च स्थानावरचा नेता आपल्या प्रश्नाची दखल घेतो. त्याला उत्तर देतो हे सामान्य माणसांसाठी खूप मोठं असतं. ती आठवण  त्याच्या आयुष्यभर लक्षात राहते. पंतप्रधानांची ही सक्रियता आता आणखी वाढणार आहे.

First published: January 1, 2019, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading