VIDEO नरेंद्र मोदींनी भुतानच्या खासदाराच्या टकलावरून हात फिरवला आणि...

या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉलची पर्वा न करता अतिशय सहजतेने संवाद साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 10:54 PM IST

VIDEO नरेंद्र मोदींनी भुतानच्या खासदाराच्या टकलावरून हात फिरवला आणि...

थिंपू 18 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा भुतानचा दौरा संपवून रविवारी भारतात परतले. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान 10 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत भुतानला अंतरिक्ष संशोधनासह अनेक क्षेत्रात मदत करणार आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौराअतिशय यशस्वी ठरल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

मोदींच्या नावाने काही तरी हवं; भाजप खासदार म्हणाले, 'या' विद्यापीठाचं नाव बदला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच भुतान दौरा होता. भुतान हा भारताचा अतिशय जवळचा मित्रदेश आहे. त्यामुळे या दौऱ्याला एक वेगळं महत्त्व होतं. पंतप्रधानांनी रॉयल भुतान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधीतही केलं. अध्यात्मिक, भौतिक आणि सामाजिकदृष्ट्या भुतान हा भारताचा नैसर्गिक मित्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये जास्तीत जास्त आदान प्रदान व्हावं असं मतही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. शेवटच्या सत्रात पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुतानचे सर्व खासदार एकत्र जमले होते. सामुहिक फोटोसाठी सर्व खासदार आणि अधिकारी मोदींची वाट पाहात बसले होते. पंतप्रधान आल्यानंतर ते मध्यभागी उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या बाजूचे खासदार आपल्या गुळगुळीत डोक्यावरून हात फिरवित होते.

Loading...

फक्त पाक व्याप्त काश्मीरबद्दल चर्चा होईल; राजनाथ सिंह यांनी दिले सडेतोड उत्तर!

पंतप्रधानांचं त्याकडे लगेच लक्ष गेलं. त्यांनीही आपला हात त्यांच्या टकलावरून फिरवला. सुरुवातीला त्या खासदाराच्या लक्षात आलं नाही की नेमकं काय झालं. नंतर जेव्हा सगळ्यांचं लक्ष गेलं तेव्हा सगळेच हास्यकल्लोळात बुडाले. या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉलची पर्वा न करता अतिशय सहजतेने संवाद साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 10:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...