आईच्या भेटीने गहिवरले पंतप्रधान मोदी!

आईच्या भेटीने गहिवरले पंतप्रधान मोदी!

नुकतीच दिवाळी झाली आणि गुजराती नववर्षही झालं त्यामुळे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले आणि प्रकृतीची विचारपूस केली.

  • Share this:

गांधीनगर 30 ऑक्टोंबर : नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची 144वीं जयंती आहे. त्यानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते गुजरातमध्ये आले आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी पंतप्रधान मोदींच (PM Modi) स्वागत केलं.गांधीनगरला आल्यानंतर ते सरळ आपल्या घरी गांधीनगरला गेले आणि त्यांनी  आई हिराबेन यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.

नुकतीच दिवाळी झाली आणि गुजराती नववर्षही झालं त्यामुळे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले आणि प्रकृतीची विचारपूस केली.

हिराबेन यांनीही मोदींची विचारपूस केली आणि प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

कामात व्यस्त राहतानाच प्रकृतीची काळजी घे असं आईने सांगताच पंतप्रधान मोदी गहिवरले.

पंतप्रधान उद्या केवडिया इथं जाऊन ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ (Statue of Unity) इथं सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 144व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असू त्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading