• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार नवी भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण

जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार नवी भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवड्यात याचं लोकार्पण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरील जवळपास साडे आठ किलोमीटर लांब असलेल्या बोगद्याचं लोकार्पण करू शकतात. हा बोगदा बनिहाल कांजीगुंड राष्ट्रीय महामार्गावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवड्यात याचं लोकार्पण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या बोगद्याची पाहणी केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास साडे आठ किलोमीटर लांब असलेला हा बोगदा संपूर्ण तयार झाला आहे. या महामार्गाचे बांधकाम नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे. सोबतच हा संपूर्ण हायवे वर्षभर चालावा या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला आहे. कांची गुंड बनीयाल बोगदा हा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाला सदाबहार महामार्ग बनवण्यासाठी याची बरीच मदत होऊ शकते. या मार्गाचं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मोठं महत्त्व आहे. वर्तमान काळात काश्मीरला रस्त्याच्या मार्गाने पोहोचायचं असेल तर जवाहर बोगदा पार करावा लागतो. मात्र कांची गुंड बनिहाल बोगदा हा जवाहर बोगद्याचा विकल्प ठरू शकतो. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी धुमस कलम आणि हिमपात होत असतो. मात्र हा महामार्ग सुरू झाल्यानंतर संवेदनशील क्षेत्रांमधील महत्त्वाच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अजून काही औपचारिक माहिती पुढे आली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बोगद्याचे लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर हा संवेदनशील भाग झालेला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी घटनादेखील होत असल्याची माहिती पुढे येत आहे. अशावेळी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा बोगदा अतिशय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
Published by:Akshay Shitole
First published: