मराठी बातम्या /बातम्या /देश /'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'

'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'

देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मन की बातमधून पाकिस्तानला दिलाय.

देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मन की बातमधून पाकिस्तानला दिलाय.

देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मन की बातमधून पाकिस्तानला दिलाय.

    नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आपण शांततेवर विश्वास ठेवतो. मात्र देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून पाकिस्तानला थेट इशारा दिलाय.

    मागच्या काही दिवसांत सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद झालेत. त्यावर बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या आठवणीही त्यांनी जागवल्या आणि सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीला सलामही केला.

    पाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर

    दरम्यान, पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलंय. रविवारी दुपारी पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आलं. भारतीय सीमेच्या आत पांढऱ्या रंगाचं हे हेलिकॉप्टर दुपारी 12.13 वाजता आढळून आलं. हेलिकॉप्टर आढळून येताच लष्कराने हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर ते तातडीनं माघारी फिरलं. घुसखोरांसाठी हा प्रदेश संवेदनशील असल्यानं पाकचा दुष्ट हेतू पुन्हा एकदा उघड झालाय.

    या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय. त्यात हे पांढऱ्या रंगाचं हेलिकॉप्टर दिसून येतं. गोळीबाराच्या आवाजानंतर हेलिकॉप्टर परत गेल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट होतं. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या झाल्याने दोन्ही देशामध्ये तणाव निर्माण झालाय.

    हे हेलिकॉप्टर रेकी करण्यासाठी भारतीय हद्दीत आलं असलं पाहिजे अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. हा परिसर घुसखोरीसाठी कुप्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या आधी घुसखोरांना भारतात पाठवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात हिमवर्षाव सुरू झाल्यानंतर घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसणं अशक्य असतं.

    दोन्ही देशांदरम्यान 1991 मध्ये एक करार झाला होता. त्यानुसार सीमेजवळ कुठली विमानं आणि हेलिकॉप्टर आणि किती जवळ येवू शकतात याची नियमावली ठरली होती. त्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही भारताने केला आहे.

     टीम इंडियामधून ४ मोठ्या खेलाडूंना बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता

    First published:

    Tags: 'मन की बात', Helicopter, India, Jammu and kashmir, Man Ki Bat, Pakistan, Poonch district, Prime minister narendra modi, इशारा, जम्मू आणि काश्मीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तान, पुंछ जिल्ह्यात, भारत, हेलिकॉप्टर