#ThisHappened2019 : ट्विटरवरही PM मोदींची जादू! 'हे' ट्वीट ठरले गोल्डन

#ThisHappened2019 : ट्विटरवरही  PM मोदींची जादू! 'हे' ट्वीट ठरले गोल्डन

ट्विटर इंडियानं दरवर्षीप्रमाणे यंदाही 2019मधील सर्वोत्तम ट्वीट कोणते होते, तसेच हॅशटॅग यांची एक यादी जाहीर केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 : ट्विटर इंडियानं दरवर्षीप्रमाणे यंदाही 2019मधील सर्वोत्तम ट्वीट कोणते होते, तसेच हॅशटॅग यांची एक यादी जाहीर केली. यामध्ये भारतातील ट्विटरवर प्रसिध्द नेत्याचा मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. त्यामुळं ट्विटरवरही मोदींची लाट दिसून आली. यात मोदींचे लोकसभा निवडणुकांनंतरचे ट्वीट सर्वात लोकप्रिय ठरले.

भारतीय जनता पक्षाने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट हे 2019मधले सर्वात जास्त वेळा रिट्वीट झाले. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या या ट्वीटला 'गोल्डन ट्विट' असा किताब ट्विटरच्या वतीनं देण्यात आला. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने मंगळवारी #ThisHappened2019 यासह ही माहिती दिली. तर, 2019मध्ये सर्वात लोकप्रिय अकाउंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

याचबरोबर क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीने एम.एस. धोनीच्या वाढदिवसादिवशी टाकलेला फोटो हा क्रीडा जगातील सर्वाधिक लाईक केले गेलेले ट्वीट होते. धोनीच्या वाढदिवशी कोहलीने या दोघांचेही एक चित्र शेअर केले होते, जे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्तम क्षण ठरले.

दुसरीकडे हॅशटॅगच्या बाबतीत, हॅशटॅग लोकसभा 2019 हे सर्वाधिक ट्वीट केलेले हॅशटॅग होते. त्यानंतर चंद्रयान 2, हॅशटॅग सीडब्ल्यूसी 19, हॅशटॅग पुलवामा आणि हॅशटॅग कलम 370 हे सर्वाधिक ट्वीट केलेले हॅशटॅग आहेत.

यावर्षी भारतासाठी सर्वात रोमांचक क्षण आणि घटना म्हणजे इस्रो हॅशटॅग चंद्रयान 2 मिशन. या मोहिमेने अंतराळ क्षेत्रात भारताच्या योगदानाचे अधोरेखित केले, जगाने या मोहिमेच्या प्रत्येक कार्यास प्रतिसाद दिला.

त्याचवेळी, राजकारणाच्या क्षेत्रात ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरल्या त्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा, माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या