मोदी 2.0: केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; या पक्षांना मिळणार संधी!

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 11:43 AM IST

मोदी 2.0: केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; या पक्षांना मिळणार संधी!

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.

मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी मित्रपक्षांच्या कोट्यातून काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या या फेरबदलाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा देखील घेणार असल्याचे समजते. हा आढावा घेतल्यानंतरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे समजते. संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 सप्टेंबर ते 13 डिसेंबर या काळात होणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 तारखेला जाहीर होणार आहे. या दोन्ही राज्याचे निकाल जाहीर होण्याआधी मोदी सरकारने प्रशासनात मोठे बदल केले आहेत. मंगळवारी 11 सचिव आणि 12 ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्याच बरोबर गेल्या काही महिन्यापासून वादामुळे चर्चेत राहिलेले स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या नव्या आयुक्तांची निवड करण्यात आली. जम्मू-काश्मीर कॅडरचे आयएएस अधिकारी ब्रज राज शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षामध्ये झालेला गोंधळ आणि अनेक तक्रारीमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन चर्चेत आहे. शर्मा यांच्यासह संजीव नंदन सहाय यांची पॉवर सेक्रेटरीपदी नियुक्त करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात प्रशासनात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयातील टीम नव्याने तयार करण्यात आली होती. पण आतापर्यंत महत्त्वाच्या मंत्रालयातील सचिव बदलण्यात आले नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...