मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्व नेत्यांना टाकलं मागे...वाचा कसा रचला इतिहास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्व नेत्यांना टाकलं मागे...वाचा कसा रचला इतिहास

2014 मधली लोकसभा निवडणूक भाजपने किंबहुना NDA ने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं मोठं यश मिळवलं .

2014 मधली लोकसभा निवडणूक भाजपने किंबहुना NDA ने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं मोठं यश मिळवलं .

कोरोना काळात (Coronavirus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) जगभरातील लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : कोरोना काळात (Coronavirus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) जगभरातील लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन एजन्सी मॉर्निंग कंसल्‍टने (Morning Consult) केलेल्या सर्वेतून ही महत्त्वपूर्व बाब समोर आली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदींची एकूण अप्रूवल रेटिंग 55 आहे. एजन्सीच्या रिपोर्टमध्ये असंही दाखविण्यात आलं आहे की, नरेंद्र मोदींची लोकप्रियता सर्व जागतिक नेत्यांपेक्षा सर्वात अधिक आहे. ही एजन्सी जगभरातील नेत आणि सरकारची अप्रूवल रेटिंग जारी करते.

आणखी कोणाच्या लोकप्रियतेत वाढ

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स  (Morning consult political intelligence) यांनी वर्तमान परिस्थितीत 13 देशांतील (ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, यूनाइटेड किंगडम, संयुक्त राज्य अमेरिका) नेत्याची  अप्रूवल रेटिंग जारी केली आहे. एजन्सीच्या ताज्या सर्वेमध्ये पीएम मोदी यांच्याव्यतिरिक्त ज्या अन्य नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, त्यात मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅनुअल लोपेज ओबराडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा सहभाग आहे. सर्वेनुसार 22 डिसेंबरपर्यंत मॅक्सिकन राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅनुअल लोपेज ओब्रेडोर यांचा स्कोअर 29 होता, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा स्कोअर 27 होता.

जगातील सर्वात मोठं टीकाकरण अभियान भारतात सुरू

यादरम्यान PM नरेंद्र मोदी भारतात जगातील सर्वात मोठं कोरोना लशीच्या टीकाकरणाचं अभियान सुरू करणार आहेत. त्यांनी आज गुजरातमधील राजकोटमध्ये एम्सची पायाभरणी करताना याबाबत विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठा लशीकरण (Covid-19 vaccination) अभियान चालविण्याची तयारी करीत आहे. ते पुढे म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाची नवी प्रकरणांची संख्या आता कमी होत आहे. आम्ही पुढील वर्षी जगातील सर्वात मोठं लशीकरण कार्यक्रम चालविण्याची तयारी करीत आहोत.

पीएम मोदींनी सांगितला 2021 चा मंत्र

पीएम मोदी पुढे म्हणाले की, स्वास्‍थ्‍य हीच संपदा आहे, हे वर्ष 2020 ने आपल्याला व्यवस्थित शिकवलं आहे. 2021 मध्ये आपल्याला स्वास्थ सेवेत भारताची भूमिका अधिक मजबूत करावयास हवं.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Narendra modi