मुंबई, ता. 04 जून : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांचं भाषण आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांची उत्तर नेहमी आधीच लिहलेली असतात असं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.
'हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्या मुलाखतींमधले प्रश्न हे आधीच लिहलेले असतात' अशी टीका करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.
सिंगापूरच्या नान्यांग टेकनोलॉजिकल विद्यापीठात मोदींच्या झालेल्या मुलाखतीवर आरोप करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते असं की, या मुखातीमध्ये नरेंद्र मोदींना एशियामधील समस्यांविषयी प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आधीच अनुवादकाने दिलं होतं आणि ते लिखित स्वरुपात होतं.
पण अनुवादकाने वाचताना आपल्या कामाची काही आकडेवारीही सांगितली जी मोदींना सांगता आली नाही. याच घटनेवर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची भाषण आणि मुलाखती आधीच लिखित असतात अशी टीका केली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी विरोधी पक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
The first Indian PM who takes "spontaneous" questions that the translator has pre-scripted answers to!
Good that he doesn't take real questions. Would have been a real embarrassment to us all if he did. pic.twitter.com/8Iyfgiaseh — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Narendra modi interviews, Prime minister interviews, Rahul gandhi