Home /News /national /

 wheat export : भारत जगाची भूक भागवणार, मोदींनी गहू पुरवठा, साठवणुकीबाबत घेतली बैठक

 wheat export : भारत जगाची भूक भागवणार, मोदींनी गहू पुरवठा, साठवणुकीबाबत घेतली बैठक

रशिया- युक्रेन युद्धामुळे (russia-ukraine war) युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. (wheat)

  नवी दिल्ली, 07  मे : रशिया- युक्रेन युद्धामुळे (russia-ukraine war)  युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. अलीकडील काही दिवसांत भारतातून सुमारे ५ लाख टन गहू निर्यातीसाठी (wheat export) व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू (international market) , खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगात धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाल्याचे वृत्त Reuters दिलं होतं.

  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तीन दिवसांचा युरोप दौरा  केला यानंतर भारतात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच (५ मे) गहू पुरवठा, साठवणूक, निर्यातीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. गहू उत्पादन, सरकारी खरेदीबाबत केंद्र सरकारकडून सुधारित अंदाज जारी करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून गव्हाचा पुरवठा, साठवणूक आणि निर्यातीचा आढावा घेण्यात आला. हे ही वाचा : ''आमच्या पंतप्रधानांना...'', महागाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा दरम्यान झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींना अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या ते म्हणाले कि,  भारत अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांचा विश्वासार्ह स्रोत बनायला हवा. यासाठी मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेचे निकष, स्टँडर्ड राखण्याच्या सूचना केल्या आहेत. पंतप्रधानांचे मुख्य सचिव, सल्लागार, कॅबिनेट सचिव, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा सचिव या बैठकीस हजर होते. मार्च ते एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादन घटल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. सरकारी खरेदी केंद्रावरील परिस्थिती, गहू निर्यातीबद्दल त्यांना अवगत करून देण्यात आले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. गव्हाची सरकारी खरेदी १ कोटी ९५ लाख टन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने ४ मे २०२२ रोजी वर्तवला आहे. निर्धारित ७५ लाख टन गहू साठ्याच्या तुलनेत भारताकडे ८० लाख टन गव्हाचा उपलब्ध असणार आहे. केंद्र सरकारने गहू उत्पादनाचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. सरकारने सुधारित अंदाजात गहू उत्पादन ११ कोटी १५ लाख टनांऐवजी १० कोटी ५० लाख टन होणार असल्याचे नमूद केले आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे. दरम्यान, भारतात सलग वर्षे गव्हाचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा शिल्लक आहे. यामुळे व्यापारी आता निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Narendra modi, Pm modi, Russia Ukraine

  पुढील बातम्या