लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात, कसं पचवता सगळं? मिलिंद सोमणच्या प्रश्नावर मोदींनी दिलं हे उत्तर!

लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात, कसं पचवता सगळं? मिलिंद सोमणच्या प्रश्नावर मोदींनी दिलं हे उत्तर!

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंटची सरूवात केली होती. लोकांमध्ये फिटनेस बद्दल जन जागृती व्हावी आणि त्यांनी व्यायामाकडे वळावं हा त्यामागचा हेतू होता.

  • Share this:

नवी दिल्ली 24 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त देशभरातल्या मान्यवरांशी संवाद साधला. फिटनेस बद्दल जन-जागृती करणाऱ्यांची यासाठी निवड झाली होती. फिटनेससाठी कमालीचा जागरूक असलेला अभिनेता मिलिंद सोमण हा यात सहभागी झाला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मानसिक फिटनेसचं गुपीत विचारलं. लोक तुमच्यावर एवढी टीका करतात, वाईट बोलतात हे सगळं तुम्ही कशा प्रकारे सहन करता असं प्रश्न त्यांने पंतप्रधानांना विचारला. त्यावर पंतप्रधानांनीही मनमोकळं उत्तर दिलं.

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंटची सरूवात केली होती. लोकांमध्ये फिटनेस बद्दल जन जागृती व्हावी आणि त्यांनी व्यायामाकडे वळावं हा त्यामागचा हेतू होता. त्यानंतर मिलिंद सोमण यांच्या 81 वर्षांच्या आईचा पुशअप करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला. तो व्हिडीओ मी 5 वेळा पाहिला असंही ते म्हणाले.

त्यानंतर मिलिंद सोमण यांनीही पंतप्रधानांना प्रश्न विचारला, ते म्हणाले, तुम्ही या वयातही सतत कार्यमग्न असता. लोक तुमच्यावर टीका करतात, वाईट बोलतात त्या सगळ्या ताण-तणावाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता असं त्यांनी विचारलं.

त्यावर उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले, ‘निंदक नियरे रखिए’ म्हणजेच निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण आहे. मी कायम माझ्यासाठी काहीही करत नाही. लोकांचं कल्याण व्हावं हाच माझा कायम हेतू असतो. त्यामुळे लोक काय म्हणतात याचा मी विचार करत नाही.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिलिंद सोमण यांना त्याच्या वयाबद्दल प्रश्न विचारला, त्यावर आपल्या आई येवढं वय झाल्यावरही तसेच फिट राहण्याचा आपला निश्चय असल्याचं मिलिंद सोमणने सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 24, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading