मराठी बातम्या /बातम्या /देश /

3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, तरी PM मोदींना सतावतेय एक चिंता

3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, तरी PM मोदींना सतावतेय एक चिंता

नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. मात्र असे असले तरी मोदींनी वाढती हॉटस्पॉट क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. मात्र असे असले तरी मोदींनी वाढती हॉटस्पॉट क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. मात्र असे असले तरी मोदींनी वाढती हॉटस्पॉट क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. आज देशाच्या जनतेशी संबोधताना मोदींनी ही घोषणा केली. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसेच, येत्या 8 दिवसांच निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. याआधी काही राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. मात्र मोदींनी देशातील हॉटस्पॉट परिसरांबाबत चिंताही व्यक्त केली. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये हॉटस्पॉट सध्या चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे मोदींनी जिथे हॉटस्पॉट निर्माण होणार नाहीत, नवीन रुग्ण सापडणार नाहीत तिथे 20 एप्रिलनंतर थोडी मोकळीक मिळेल. यासाठी राज्य, जिल्हे, शहर, गावं यांचे मुल्यांकन केले जाणार आहे. त्याआधी सरकारच्या वतीने या भागातील नियम शिथील करत, तेथील सेवा अंशत: सुरू केल्या जातील. मात्र कोरोनाचा शिरकाव झाला तर पुन्हा निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट केले. वाचा-संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा मोदींनी व्यक्त केली चिंता देशाला संबोधताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात 550 रुग्ण होते तेव्हा भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला. देशात कोरोना शिरण्याआधी एअरपोर्टवर परदेशातून येणाऱ्या लोकांचे स्क्रिनिंग सुरू करण्यात आले. जर वेळीच हे सगळे निर्णय घेतले नसते तर आता भारताची स्थिती भयावह असती, याचा विचार करणंही अंगावर काटा आणतात, अशी भीती मोदींनी व्यक्त केली. देशातील वाढते हॉटस्पॉट चिंतेचा विषय असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. वाचा-लॉकडाऊन वाढवला पण 20 एप्रिलनंतर 'या' भागात शिथिल होणार नियम आर्थिकदृष्ट्या फटका पण निर्णय महत्त्वाचा 3मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यास याचा आर्थिकदृष्ट्या खूप फटका बसेल मात्र देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. तसेच, मोदींनी लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करण्यासही सांगितले. 20 एप्रिलनंतर मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतरच काही सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले. देशातील कामगारांना याच फटका बसत आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. वाचा-पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा!
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या