पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा देताच स्मृती इराणी म्हणाल्या....

पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा देताच स्मृती इराणी म्हणाल्या....

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर स्मृती इराणींनी त्यांचे आभार मानले.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या अनेक महत्त्वाच्या कामात योगदान दिलं आहे. त्यांच्या दिर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

स्मृती इराणी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यासाठीही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले की, माझ्याकडून तुम्हाला आगामी लोकसभेत अमेठी मतदारसंघातून लढण्यासाठी शुभेच्छा. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोदींच्या ट्वीटला उत्तर दिलं आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. तसेच अमेठी तयार असून पुन्हा एकदा मोदी सरकार असेही त्या म्हणाल्या.

याआधी स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींना वाराणसीतून भाजप उमेदवारी मिळाल्यानंतर शुभेच्छा दिल्या होत्या. तर स्मृती इराणी यांना भाजपने दुसऱ्यांदा अमेठीतून तिकीट दिलं आहे. गेल्यावेळी त्यांना राहुल गांधींकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पक्षाने पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.

पंतप्रधान मोदींना वाराणसीची उमेदवारी दिल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी म्हटले की, गेल्या पाच वर्षात वाराणसीचे प्रतिनिधित्व करताना मोदींनी देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांना पुन्हा एकदा पवित्र अशा वाराणसीतून निवडणूक लढण्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या