'खातं उघडलं नाही आणि म्हणे पैसे जमा करणार', PM मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

'खातं उघडलं नाही आणि म्हणे पैसे जमा करणार', PM मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

ज्यांनी गरिबांची बँक खाती उघडली नाहीत ते त्यांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

  • Share this:

मेरठ (उत्तर प्रदेश), 28 मार्च:  ज्यांनी गरिबांची बँक खाती उघडली नाहीत ते त्यांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील प्रचार सभेतून मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

VIDEO : सगळ्यांचा हिशेब मांडला जाईल; मेरठमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल


काय म्हणाले मोदी-

एकीकडे चौकीदार दुसरीकडे वारसदार

मी चौकीदार आहे कधी अन्याय करणार नाही

सगळ्यांचा योग्य वेळी हिशेब मांडला जाईल

तुम्ही हे जाणता की मी चौकीदार आहे

सक्षम भारताशी निगडित या निवडणुका आहेत

तुमचं प्रेम मी व्याजासहीत परत करेन

पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत येणार आहे

देशाच्या 130 कोटी नागरिकांनी आपला निर्णय घेतला आहे

अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस या सरकारमध्ये, हे सरकार संकल्पांना सिद्धीस नेणारे आहे

गेल्या सरकारच्या अपयशाचा जाब विचारणार

महाबनावट सरकारच्या काळात बदमाश लोक होते

या सरकारने वन रॅंक वन पेन्शनचं वचन पूर्ण कले

सामान्य ,वर्गाला आम्ही 10 टक्के आरक्षण दिले

सबका साथ सबका विकास हेच आमचे तत्व

आम्ही महिलांसाठी शौचालय उपलब्ध करुन दिली

ज्यांनी गरीबांची बॅंकेत खाती उघडली नाहीत ते खात्यात पैसे काय घालणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या