VIDEO : काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधानांच्या मागणीवरून नरेंद्र मोदी आक्रमक

VIDEO : काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधानांच्या मागणीवरून नरेंद्र मोदी आक्रमक

ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असेल असं वक्तव्य केल्यानंतर मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

  • Share this:

सिकंदराबाद, 1 एप्रिल : काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान असेल या ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ओमर अब्दुल्लांच्या विधानावर मौन बाळगल्याबदंदल विरोधकांनाही धारेवर धरलं आहे.

तेलंगणातील सिकंदराबादमध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचा एक मोठा सहकारी असलेल्या पक्षाच्या नेत्याने काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा असं म्हटलं आहे. काँग्रेसला हे मान्य आहे का? असा प्रश्नही मोदींनी विचारला आहे.देशाचे तुकडे करण्याच्या या मानसिकतेने खूप नुकसान केलं आहे. दोन तिन दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या हे विसरू नका असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ओमर अब्दुल्लांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसची हीच मानसिकता देशाविरोधातील कारवायांना बळ देत असल्याचा आरोप मोदींनी केला.

ओमर अब्दुल्लांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, आम्ही इतिहासात जाऊ आणि 1953 च्या आधीची स्थिती निर्माण करू असं म्हणणाऱ्यांबाबत विरोधकांनी देशाला उत्तर द्यावं. पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. दोनच दिवसांपूर्वी नायडू फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत होते असंही मोदी म्हणाले.काय म्हणाले होते ओमर अब्दुल्ला ?

इतर संस्थाने कोणत्याही अटींशिवाय देशात विलीन झाली. मात्र, काश्मीरने स्वत:ची वेगळी ओळख राहील, संविधान असेल अशी अट ठेवली होती. काश्मीरमध्ये सदर ए रियासत आणि वजीर ए आलम सुद्धा होते. इन्शाह अल्लाह! आता जम्मू काश्मीरचा पुन्हा स्वतंत्र पंतप्रधान असेल.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:21 PM IST

ताज्या बातम्या