पंतप्रधान मोदींच्या Lockdown च्या भाषणाने तोडला IPL आणि नोटाबंदीचा रेकॉर्ड

पंतप्रधान मोदींच्या Lockdown च्या भाषणाने तोडला IPL आणि नोटाबंदीचा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणाऱ्या भाषणाकडे प्रत्येक भारतीय डोळे लावून होता. आतापर्यंत मोदींच्या सर्व भाषणांपैकी लॉकडाऊनच्या भाषणाने रेकॉर्ड तोडल्याची माहिती समोर आली आहे.

बार्क इंडिया रेटिंग्जने ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यापूर्वी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.

टिव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियंस रिसर्च काउन्सिल (बीएआरसी) च्या रेटिंगनुसार मोदींचे लॉकडाऊनचे भाषण त्यांच्या “जनता कर्फ्यू” आणि नोटाबंदीसह मागील सर्व भाषणांपेक्षा जास्त पाहिलं गेलं.

संबंधित - लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटणं बेतलं जीवावर, गावकऱ्यांकडून तरुणाची गळा चिरुन हत्या

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी ट्वीट केले की, “बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 24 मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिलं गेलं आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे 201 चॅनलवर दाखविण्यात आले. आयपीएलची अंतिम मॅच 13.3 कोटी जनतेने पाहिली होती. तर पंतप्रधान मोदींचे लॉकडाऊनचे भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिली.

बीएआरसीच्या (BARC) रेटिंगनुसार पंतप्रधानांचे 19 मार्चचे जनता कर्फ्यूचे  भाषण 191 टिव्ही चॅनेल्सवर दाखविण्यात आले होते, ते 8.30 कोटी लोकांनी पाहिले होते.

बीएआरसीच्या रेटिंगनुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी घटनेच्या कलम 370 रद्द करण्याबाबत भाषण केले तेव्हा ते 163 वाहिन्यांवरुन 6.5 कोटी जनतेने पाहिले. तर 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा 114 वाहिन्यांवरुन 5.7 कोटी लोकांनी पाहिले.

संबंधित - बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे 'या' देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

First published: March 27, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या