Home /News /national /

पंतप्रधान मोदी आज साधणार उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान मोदी आज साधणार उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दिल्लीत पुन्हा लॉकडाउनची चिन्ह आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक दोन भागात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र हे सकाळी 10.30 ते 12 या वेळेत असणार आहे. यामध्ये पंतप्रधान कोरोनामुळे त्रस्त असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यात दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. दुसरी बैठक ही कोरोना लसीच्या वितरणाच्या मुद्द्यावर होणार असून या दोन्ही बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यांच्यासाठी वेगळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दिल्लीत पुन्हा लॉकडाउनची चिन्ह आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर देशात पुन्हा लॉकडाउन लागू होतो का, हे पाहण्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी दरम्यान, राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात पहिल्यांदाच कमी आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपेक्षा दैनंदिन नव्या रुग्णांची (Covid-19) संख्या थोडी कमी नोंदली गेली. सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4153 कोविड रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. त्यामुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.61 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 16,54,793 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.74 % एवढं झालं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या