मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसह या मुद्द्यांवर होणार चर्चा; पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसह या मुद्द्यांवर होणार चर्चा; पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरोनाची (Coronavirus) सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला जाऊ शकतो

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरोनाची (Coronavirus) सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला जाऊ शकतो

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरोनाची (Coronavirus) सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला जाऊ शकतो

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Coronavirus) संभाव्य धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी एक बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान मोदी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढवा घेऊ शकतात. या बैठकीत आरोग्य मंत्रालय, कॅबिनेट सचिव आणि नीति आयोग सहभागी होऊ शकतात. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरोनाची सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला जाऊ शकतो. मागील जुलै महिन्यातच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल झाला आहे. यात आरोग्य मंत्रालयासह इतरही अनेक मोठ्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्यात आहेत. या कारणामुळेही ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. जाणकारांनी आधीपासून या गोष्टीबाबत चिंता व्यक्त केली आहे, की तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात.

Mumbai: काळजी वाढवणारा निकाल! genome sequencing मध्ये सापडले डेल्टाचे 128 रुग्ण

गृह मंत्रालयाकडून तज्ज्ञांचा एक पॅनल स्थापन करण्यात आला होता, ज्यानं सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज सांगितला होता. इंस्टीट्यूट ऑफ डिजाज्स्टर मॅनेजमेंटच्या एक्सपर्ट कमेटीनं हेदेखील म्हटलं, की वयस्कर लोकांसोबतच लहान मुलांनाही समान जोखीम असेल. कारण लहान मुलं मोठ्या संख्येनं संक्रमित झाल्यात डॉक्टर, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर अशा सुविधा अपुऱ्या पडणार आहेत.

निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

पंतप्रधान कार्यालयात पोहोचण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं समोर आलं आहे, की आतापर्यंत केवळ 7.6 टक्के (10.4 कोटी) लोकांचं लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झालं आहे. लसीकरणाचा वेग न वाढल्यास पुढच्या लाटेत देशात दररोज 6 लाख नवे रुग्ण समोर येऊ शकतात. महाराष्ट्रासह इतरही काही राज्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाला लागली आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, PM narendra modi