अयोध्या, 19 जुलै : येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास करणार आहेत. मोदी स्वत: अयोध्येत जाऊन भूमीपूजन करणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दयावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही नेत्यांच्या मते कोरोनाच्या कहरात राम मंदिरात भूमीपुजन करणे योग्य नाही. श्री राम मंदिराच्या भूमी पुजनात श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 40 किलो चांदी श्री राम शिलेला समर्पित करतील.
महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले की – राम मंदिराच्या शिलान्यासासाठी पंतप्रधान मोदींसह देशातील अनेक राजकीय व धार्मिक व्यक्तींना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
नृत्य गोपाल दास यांनी सांगितल्यानुसार संघाचे सर संघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शहा, राजधान सिंह यांच्यासह तब्बल 200 प्रमुख व्यक्ती अयोध्या राम मंदिर पुजनाच्या कार्यक्रमासाठी सहभागी होतील. दास यांनी सांगितले की यावेळी राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात करणारे नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.
दरम्यान अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं (Ram mandir ayodhya) भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.
हे वाचा-निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची स्वारी घोड्यावर, कोरोनामुळे फुटला घाम
कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.