मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधान मोदींनी IPS अधिकाऱ्यांना करून दिली ‘सिंघम’ स्टाईलची आठवण!

पंतप्रधान मोदींनी IPS अधिकाऱ्यांना करून दिली ‘सिंघम’ स्टाईलची आठवण!

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

देशभरातल्या 131 IPS अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. यात 28 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली 4 सप्टेंबर: IPSचं प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत प्रवेश करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संबोधित केलं. या वेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांनी अनेक सल्ले देत सूचनाही केल्या. पंतप्रधान म्हणाले, अधिकाऱ्यांनी काम करतांना मानवी दृष्टिकोन ठेवावा. फक्त दंडुक्याच्या धाकाने काम शक्य नसतं. सिंघम सारखे चित्रपट पाहून काम करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काही पोलीस अधिकारी हे स्वत:ला मोठे समजतात. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा बिघडते असंही ते म्हणाले.

काश्मीर सारख्या राज्यात काम करतांना तिथल्या महिलांशी अधिकाऱ्यांनी संवाद वाढवावा. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आईची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. असंही ते म्हणाले.

हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS सेवेत येणाऱ्यांच प्रशिक्षण होत असतं. त्यानंतर देशभर त्यांचा प्रोबेशनचा काळ सुरु होते. अशा 131 अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. यात 28 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Appsवर बंदी घातल्यानंतर भारताचा चीनला पुन्हा दणका, घेतला मोठा निर्णय

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (एसव्हीपीएनपीए) प्रशिक्षण दरम्यान अधिकाऱ्यांना कायदा, गुन्ह्यांची तपासणी,  फॉरेन्सिक्स, नेतृत्व आणि व्यवस्थापन, गुन्हेगारी, सार्वजनिक सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, मानवाधिकार, आधुनिक भारतीय पोलिस प्रणाली, जगात सुरु असलेलं संशोधन अशा सर्व प्रकारांची माहिती दिली जाते.

ठाकरे सरकारला दणका; JEE आणि NEET होणारच

गुन्ह्यांची उकल करतांना अधिकाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. त्यामुळे  कमी वेळात आणि अधिक चांगल्या पद्धतीने ही उकल करता येते असंही ते म्हणाले. लोकांशी संवाद, प्रामाणिकपणा, आणि कर्तव्य कठोरता या गुणांच्या बळावर अधिकारी देशाची चांगली सेवा करू शकतात असंही पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले.

First published:

Tags: Narendra modi