राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल कुठे, राहुल गांधींचा सवाल

राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल कुठे, राहुल गांधींचा सवाल

राफेल करारात घोटाळा झाला आहे पण यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : राफेल करारात घोटाळा झाला आहे पण यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही. जेव्हा या प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा पंतप्रधान मोदींचं नाव समोर येईल असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशाचा चौकीदार हा चोर आहे आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवूच असा दावाही त्यांनी केला.

राफेल करारावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींवर एकच हल्लाबोल केला.

राफेल कराराबद्दल खूप दिवसांपासून चर्चा आहे. आमचे फक्त दोनच प्रश्न आहे. विमानाची किंमत 526 कोटींवर 1600 कोटी कशी झाली आणि हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेड कंपनीला कंत्राट का दिले नाही. एचएएलकडे बंगळूरु इथं जमीन आहे. मग कंत्राट का दिले नाही असा सवाल राहुल गांधींनी केला.

फ्रान्सचे राष्ट्रपती सांगतात पंतप्रधान मोदींनी राफेल विमान खरेदीची आॅर्डर दिली आहे. पण मोदी यावर काहीही बोलत नाही. अरुण जेटली बोलतात, निर्मल सीतारामन बोलतात पण आपले पंतप्रधान कधी पत्रकार परिषदही घेत नाही असा टोला राहुल गांधींनी लगावला.

आज सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला. यात कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की, विमानाच्या खरेदीबाबतच्या किंमतीबद्दल कॅगचा अहवाल संसदेच्या समितीत सादर करायचा असतो. पण राफेल कराराचा असा कोणताही अहवाल सादर झालेला नाही. हा अहवाल फक्त कोर्टात दिसतोय पण संसद समितीपुढेच दिसत नाही असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

इथं 30 हजार कोटींचा घोटाळा झालाच आहे. या कराराची जेव्हा चौकशी होईल तेव्हा नरेंद्र मोदी यांचे नाव हमखास समोर येईल असा दावाही त्यांनी केली. तसंच देश की जनता जानती है, पंतप्रधान मोदी चोर आहे आणि आम्ही हे सिद्ध करू असंही राहुल गांधी म्हणाले.

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी होणार आहे अशी माहितीही राहुल गांधींनी दिली.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

दरम्यान, राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबद्दल सर्व याचिकाही फेटाळून लावल्यात.

अमित शहांचा राहुल गांधींना टोला

'पुराव्याशिवाय आरोप करणं देशहिताचं नाही, राहुल गांधींनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला,' असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राफेल प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आपला बालिशपणा सोडावा, राफेलवरचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही फटकार आहे, असंही शहा म्हणाले. दरम्यान, राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत आजच सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेलवरून सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभं करणाऱ्या विरोधकांना हा मोठा झटका आहे.

=================

First published: December 14, 2018, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading