Home /News /national /

पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा!

पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 3 मेपर्यंत लॉकडाउन कायम असणार अशी घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 3 मेपर्यंत लॉकडाउन कायम असणार अशी घोषणा केली आहे. तसंच कोरोनाविरोधात लढ्यात मोदींनी जनतेला 7 मुद्यांवर साथ मागितली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत काही ठिकाणी शिथील करण्याचेही संकेत दिले आहे. कोरोनाचा प्रसार जिथे कमी असेल तिथे सूट दिली जाणार आहे. पण त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचं कठोरपणे पालन झालं तरच हा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. त्यासोबत मोदींनी देशातील जनतेकडे 7 मुद्यांवर साथ देण्याची विनंती केली आहे. कोणतेही आहे ते 7 मुद्दे? 1. आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्या. ज्यांना जुने आजार असतील,त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशा सर्व वृद्ध व्यक्तींचा  कोरोनापासून बचाव करायचा आहे, त्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे. 2. सार्वजनिक ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्या.  सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा. दोन लोकांमधील अंतर हे 3 फूटांपेक्षा जास्त ठेवा. घरात तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करा 3. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचं आहे.  आरोग्य प्रशासनाकडून याबद्दल सूचना देण्यात आल्या आहे, त्याचं पालन करा 4. कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करा, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊन लोड करा, लोकांनाही हा अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगा 5. जेवढं शक्य होईल, तेवढी गरीब कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या घराशेजारी किंवा परिसरात असणाऱ्या गरिबांची योग्य ती खबरदारी घेऊन मदत करा 6. आपण करत असलेला व्यवसाय, उद्योग क्षेत्रात सोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल आदर ठेवा. कुणालाही  नोकरीवरून काढू नका 7. कोरोनायोद्धा जे आहे, त्यामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्वांची काळजी घ्या, त्यांना मदत करा शिथिलता आणण्यावरून मोदींनी दिला इशारा नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत काही भागांत शिथिलता आणणार असल्याचं म्हटलं असलं तरीही एक इशाराही दिला आहे. 'गरिबांसाठी, हातावर पोट असणाऱ्यांसाठी या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलनंतर सुरक्षितता असेल त्या ठिकाणी सवलत असेल. रब्बीची पीक काढणी सुरू आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. पण बेजबाबदारपणा केला तर सवलती काढून घेण्यात येतील,' असं नरेंद्र मोदी म्हणाले. हेही वाचा - पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठा निर्णय, आणखी 22 भाग होणार सील दरम्यान, संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pmo

    पुढील बातम्या