S M L

भ्रष्टाचार ,काळापैसा विरोधी लढाई जिंकल्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन-पंतप्रधान

125 कोटी भारतीय यानंतर काळा पैसा विरोधी लढाई लढले आणि जिंकले असंही पंतप्रधानांचं म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 8, 2017 10:12 AM IST

भ्रष्टाचार ,काळापैसा विरोधी लढाई जिंकल्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन-पंतप्रधान

08 नोव्हेंबर: आज नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झालं.या निमित्त साऱ्या देशातून विरोधक या गोष्टीचा विरोध करत असतानाच पंतप्रधानांनी मात्र जनतेचं अभिनंदन केलंय.

आज सकाळी पंतप्रधानांनी ट्विट केलं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवायच्या सगळ्या पाऊलांना जनतेनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल मोदींनी जनतेच वंदन केलं. तसंच आजचा दिवस हा काळा पैसा विरोधी दिवस आहे. 125 कोटी भारतीय यानंतर काळा पैसा विरोधी लढाई लढले आणि जिंकले असंही पंतप्रधानांचं म्हणणं आहे.

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी सरकारनं अनेक पाऊलं उचलली. भारताच्या जनतेनं त्याला सातत्यानं प्रतिसाद दिला. यासाठी मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. 125 कोटी भारतीयांनी निर्णायक लढाई लढली आणि जिंकली.


गेल्या वर्षी रात्री 8च्या सुमाराला पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली होती. तशीच काहीशी घोषणा ते काळ्या पैशाविरोधातल्या लढ्याबाबत करतील का, अशी चर्चा सुरू झालीय. राजकीय वर्तुळातही चर्चांना ऊत आलाय. यात तथ्य किती ते कुणालाच ठाऊक नाहीये, कारण मोदींची कार्यशैली बघता, ते अशा निर्णयांबाबत ताकास सूर लागू देत नाहीत. पण गुजरात निवडणुका तोंडावर आहेत, आणि 2019ही फार लांब नाहीये. त्यामुळे मोदींनी अशी कोणती घोषणा केली तर आश्चर्य वाटायला नको.

नोटबंदीचे काही फायदे

- बराचसा काळा पैसा बँकिंग प्रणालीत परत आला

- काळा पैसाधारकांवर कारवाई सुरू

- 2 लाखांपेक्षा जास्त बेनामी कंपन्यांची मान्यता रद्द

- नकली नोटांपासून मुक्ती

- भ्रष्टाचाराला आळा बसला

नोटबंदीचे काही दुष्परिणाम

- नोटा बदलून घेण्यासाठी जनतेला त्रासाला सामोरं जावं लागलं

- पैसे असूनही ते एटीएममधून काढताना हाल

- नव्या नोटा सगळीकडे उपलब्ध होण्यासाठी वेळ लागला

- बांधकाम क्षेत्राला फटका, नोकऱ्यांवर परिणाम

- रोखीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर परिणाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 10:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close