CAAच्या मुद्यावरून सोनिया गांधींचा PM मोदी आणि शहांवर गंभीर आरोप

CAAच्या मुद्यावरून सोनिया गांधींचा PM मोदी आणि शहांवर गंभीर आरोप

'JNUमध्ये भाजपच्या लोकांनी जो हल्ला केला तो सर्व देशाने पाहिलाय. मोदी सरकार देश चालविण्याच्या लायक नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 13 जानेवारी : CAAच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र यावरून विरोधी पक्षांमध्येच फुट बघायला मिळाली. शिवसेना, बहुजन समाज पार्टी आप हे पक्ष या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सगळे पक्ष या मुद्यावर एक आहेत हा संदेश गेलाच नाही. बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधलं राजकीय युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, CAA आणि NRCवरून मोदी आणि शहांनी देशाची दिशाभूल केली. त्यांनी खोटी माहिती देत लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. JNUमध्ये भाजपच्या लोकांनी जो हल्ला केला तो सर्व देशाने पाहिलाय. मात्र हल्लेखोरांवर अजुन कारवाई केली गेली नाही. मोदी सरकार देश चालविण्याच्या लायक नाही असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस आणि शिवसेनेत विसंवाद

CAAच्या मुद्यावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना (Shiv Sena) उपस्थित नसल्याने चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसने(Congress) शिवसेनेला निमंत्रणच दिलं नाही असंही समोर आलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा मिस कम्युनिकेशन झालं असल्याचं उघड झालंय. त्यावरून खुलासा करताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

...नाही तर भाजपचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, संभाजी ब्रिगेडची धमकी

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. माझं काहीवेळा पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. त्यानंतर अहमद पटेल यांच्याशी बोलणं झालं. थोडंसं मिस कम्युनिकेशन झालं. त्यामुळे थोडी गडबड झाली. ती पुढे होणार नाही याची काळजी घेऊ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी'; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची भाजपची घोषणा

राऊत पुढे म्हणाले, याआधी मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट केलीय, या कायद्यात काही त्रुटी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. देशभरात जे वादळ या कायद्यावरून निर्माण झालंय ते पाहता सर्व स्तरातून त्याला विरोध होतोय. या कायद्याने हिंदु मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला यश आलं नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक असतात.

First Published: Jan 13, 2020 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading