रेल्वेत नाश्ता आणि जेवण झालं महाग, प्रवास करणार असाल तर हे दर लक्षात ठेवा

रेल्वेत नाश्ता आणि जेवण झालं महाग, प्रवास करणार असाल तर हे दर लक्षात ठेवा

रेल्वेने गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच हे दर वाढवले असून आता गुणवत्ताही वाढवा असा सल्ला लोकांनी दिलाय.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर :  सगळ्यांना आता वेध लागले ते डिसेंबर महिन्यातल्या सुट्ट्यांचे ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये प्रवासाचा बेत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रेल्वेने प्रवासादरम्यान देण्यात येत असलेल्या नाश्ता आणि जेवणाचे दर वाढवले आहेत. 2014 नंतर रेल्वेने पहिल्यांदाच हे दर वाढवले असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. जेवण आणि नाश्त्याचे दर वाढवावे अशी मागणी पुरवढादारांनी केली होती. कारण गेल्या पाच वर्षात महागाई वाढली असून त्याच भावांमध्ये जेवण आणि नाश्ता परवडत नसल्याने भाव वाढविल्याचं म्हटलं जातंय. व्दितीय आणि तृतीय क्षेणीच्या AC आणि चेयर कार कोचमध्ये चहाची किंमत 5 रुपयांनी वाढलीय. त्यामुळे या कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 15 ऐवजी 20 रुपये द्यावे लागतील. व्दितीय आणि तृतीय क्षेणीच्या AC आणि चेयर कार कोचमध्ये प्रवाशांना नाश्तासाठी 8 रुपये जास्त द्यावे लागतील. त्यामुळे आता नाश्त्यासाठी 97 रुपयां ऐवजी 105 रुपये द्यावे लागतील. राजधानी, दुरंतो आणि शताब्दी गाड्यांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत.

रिलीज होताच रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या नव्या 'रिमिक्स'ने केली धम्माल!

व्दितीय आणि तृतीय क्षेणीच्या AC आणि चेयर कार कोचमध्ये जेवण 10 रुपयांनी महाग झालंय. आता प्रवाशांना 175 रुपये नाही तर 185 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारने रेल्वेच्या स्वच्छतेसाठी मोठं अभियान सुरू केलंय. रेल्वे स्टेशन्स अत्याधुनिक आणि प्रवाशांना सुविधा देणारे असावेत यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. रेल्वेने गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच हे दर वाढवले असून आता गुणवत्ताही वाढवा असा सल्ला लोकांनी दिलाय.

नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी नवी योजना

वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने घट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. अनेक मोठ्या कंपन्यांनी आठवड्यातले काही दिवस कामही बंद ठेवलं होतं. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक सवलतींच घोषणा केली होती. आता मोदी सरकार ऑटो सेक्टरला (Auto Industry) चालना देण्यासाठी काही सवलतींची घोषणा करण्याची शक्यता असून नवीन कार घेणाऱ्यांसाठी ते गिफ्ट ठरणार आहे. 'CNBC-आवाज'ने याबाबतचं EXCLUSIVE वृत्त दिलंय.नितीन गडकरी यांचं रस्तेवाहतूक मंत्रालय या योजनेवर काम करत असून त्याचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे.

रोमँटिक ठिकाणी अनोळखी व्यक्तिंना Kiss करते ही तरुणी, कारण ऐकून बसेल धक्का

यासंबधातली स्क्रॅप पॉलिसी सरकार आणणार असून रस्ते वाहतूक, परिवहन, पोलाद आणि पर्यावरण मंत्रालय हे धोरण तयार करतेय. या धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार असून 15 दिवसांमध्ये त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. जुन्या झालेल्या व्यावसायिक गाड्यांवर काही बंधनं लावण्यात येणार आहेत. या जुन्या गाड्या विकून नव्या गाड्या घेतल्या तर त्यावर सुट देण्याचा सरकारचा विचार आहे.

Tags:
First Published: Nov 15, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading