प्राचार्यांना माफी मागायला लावली अभाविपच्या सदस्यांनी मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यासमोर हात जोडून माफी मागण्यास भाग पाडले. थोड्या वेळाने मुख्याध्यापक मुलीच्या पायाला स्पर्श करताना दिसतात. सोशल मीडियावर, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (काँग्रेसची विद्यार्थी शाखा) ABVP सदस्यांच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. भाविक सोलंकी यांनी या पद्धतीचे वर्तन लज्जास्पद असल्याचे वर्णन केले. प्राचार्यांनी नंतर ABVP नेत्यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. गुजरातमधील खासगी महाविद्यालयात हा प्रकार घडला. हे वाचा - मोदी सरकारचा अचानक मोठा निर्णय, गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी अभाविपची प्रतिक्रिया हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ABVP ने याप्रकरणी माफी (Apology) मागितली आहे. शिक्षक-विद्यार्थ्याच्या पवित्र नात्यावर आपला विश्वास असून अक्षत जैस्वालच्या अशा वर्तनाचे समर्थन करत नसल्याचे अभाविपच्या वतीने सांगण्यात आले आहे. नंतर असं सांगण्यात आलं की, जैस्वाल यांना त्यांच्या चुकीमुळे संस्थेतून काढून टाकण्यात आले (expelled) आहे.ગુરૂ ની ગરિમા ને તાર- તાર કરનાર @ABVPGujarat નાં નેતાઓ સામે @jitu_vaghani શિક્ષણ વિભાગ ખુદ ફરિયાદી બને - @NSUIGujarat @Neerajkundan@jagdishthakormp @Pawankhera @rssurjewala @drmanishdoshi@IG_Gohil_ @SatveerINC @Mahipalsinh_INC#SameOnABVP#एबीवीपी_के_गुंडे pic.twitter.com/IBXsYc87H8
— Bhavik Solanki (@bhaviksolankee) May 13, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat