कोण बनणार राष्ट्रपती? आजपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Jun 14, 2017 10:37 AM IST

कोण बनणार राष्ट्रपती? आजपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू

14 जून : आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसुचना जारी कऱण्यात येईल. 28 जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज यूपीएच्या अनेक घटकपक्षांशी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदावार देण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी तयार केलेल्या 10 सदस्यीस समितीची देखील पहिली बैठक आज दिल्लीत होणार आहे.

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपतो आहे. एनडीए आणि यूपीए या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू आहेत. नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्य

निवडणुकीची आज अधिसूचना काढणार

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 जून

उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी 29 जून

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 1 जुलै

मतदानाची गरज पडल्यास 17 जुलैला मतदान

मतमोजणी 20 जुलैला होणार

कोण होणार राष्ट्रपती? (राष्ट्रपती होण्यासाठी काही निकष)

उमेदवाराचे वय 35हून अधिक असावे

उमेदवार भारताचा नागरिक असावा

50 निवडलेल्या (नामांकित नव्हे) आमदारांचा वा खासदारांचा त्याला पाठिंबा असावा

15 हजार रूपये अनामत रक्कम आरबीआयमध्ये त्याने जमा केलेले असावे

गुप्त पद्धतीने मतदान

प्रत्येक मतदाराला कुठल्याही उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र

कुठलाही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close