राष्ट्रपतीपदासाठी 96 टक्के मतदान, 20 तारखेला मतमोजणी

राष्ट्रपतीपदासाठी 96 टक्के मतदान, 20 तारखेला मतमोजणी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची 20 तारखेला मतमोजणी होणार आहे तर नवे राष्ट्रपती 25 तारखेला आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : देशाचा 14 वा राष्ट्रपती निवडण्यासाठी आज मतदान झालं. देशभरातले सर्व निर्वाचित आमदार आणि खासदार या मतदान प्रक्रियेसाठी पात्र होते. राष्ट्रपतीपदासाटी देशभरात 96 टक्के मतदान झालं. राजकीय समीकरणानुसार या एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं पारड निश्चितच जड आहे. अशातच विरोधकांची काही मतं फोडण्यात भाजप यशस्वी झाल्याने कोविंद यांच्या विजयाची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची 20 तारखेला मतमोजणी होणार आहे तर नवे राष्ट्रपती 25 तारखेला आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारतील.

रामनाथ कोविंद हे नक्कीच प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय. तर जातीयवादी शक्तींना थोपवण्यासाठी मतदान करा, असं आवाहन सोनिया गांधीनी केलं होतं. पण एनडीएच्या बाजुचं निर्णायक संख्याबळ पाहता मीरा कुमार यांचा विजय काहीसा दुरापास्तच वाटतोय. दरम्यान, त्रूणमुलच्या त्रिपुरातल्या 6 आमदारांनी या निवडणुकीत उघडपणे रामनाथ कोविंद यांना मतदान केलं, हे सहाही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. उत्तरप्रदेशातही मुलायम सिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांनी रामनाथ कोविंद यांनाच मतदान केलंय.

महाराष्ट्रातही 288 पैकी 287 आमदारांनी राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा हक्क बजावला. सध्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनीही मतदानाचा विधान भवनात येऊन मतदान केलं. भुजबळ यांना रुग्णवाहिका तर रमेश कदम यांना पोलिस व्हॅनमधून मतदानासाठी जेलबाहेर आणण्यात आलं होतं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे सध्या परदेशात असल्याने या मतदानाला गैरहजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 06:20 PM IST

ताज्या बातम्या