आता जास्त शो ऑफ नाही, राष्ट्रपती कोविंद वर्षभर 30 टक्के वेतन करणार दान

आता जास्त शो ऑफ नाही, राष्ट्रपती कोविंद वर्षभर 30 टक्के वेतन करणार दान

2021 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडवेळी राष्ट्रपती नव्या अलिशान कारमधून हजर राहणार होते मात्र आता खरेदीला स्थगिती देण्यात आली असून राष्ट्रपती भवनाकडून खर्च कमी कऱण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या या संकटात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांचे एक महिन्याचे वेतन पीएम केअर्स फंडात देत आहेत. तसंच वर्षभर वेतनातील 30 टक्के रक्कम दान करतील. यासह अनेक प्रस्तावांना त्यांनी स्थगिती दिली आहे.

राष्ट्रपती भवनाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी लिमोजीन कार खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थगित केला आहे. रामनाथ कोविंद यावर्षी एक नवी लिमोजीन कार खरेदी करणार होते. आतापर्यंत ते मर्सिडीज बेंझ एस क्लास (एस 600) च्या जुन्या मॉडेलचा वापर करत होते. यासाठी 2021 च्या प्रजासत्ताक दिनी नव्या लिमोजीन कारमधून ते परेडला हजेरी लावणार होते. मात्र कोरोनाचे संकट पाहता त्यांनी हा प्रस्ताव स्थगित केला आहे. राष्ट्रपती भवनातील कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच वाचलेले पैसे कोरोनाशी लढण्यासाठी द्यावेत असंही आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पावलं उचलण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती भवनाकडून आयोजित केले जाणारे कार्यक्रम, जेवणासाठी आमंत्रित कऱण्यात येणारे पाहुणे, स्वागतासाठी फुलांचा वापर, जेवणामध्ये पदार्थांची संख्या यावर कमी खर्च कऱण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रपती देशांतर्गत दौरा कमी कऱणार असून कमीत कमी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पाहुण्यांच्या स्वागतामध्ये काही कमी पडणार नाही पण यापुढे जास्त शो ऑफ केला जाणार नाही असंही राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा : शेतकऱ्यांना व्याज माफ, मजुरांना मोफत रेशन; अर्थमंत्र्यांच्या 9 मोठ्या घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3722 रुग्ण आढळले आहेत. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78003 इतकी झाली आहे. मृतांची संख्याही 2549 वर पोहोचली आहे. जगात 50 हजार पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे.

हे वाचा : देशात गाजणारं मराठवाड्यातलं COVID-19 वैजापूर मॉडेल आहे तरी काय?

First published: May 14, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading