12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

या विधेयकानुसार 12 वर्षांच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल.

  • Share this:

22 एप्रिल : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची तरतूद करणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. पॉक्सो कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. अध्यादेशावर राष्ट्रपतींची सही लागते, असा कायदा आहे. अतिशय महत्वाचा अध्यादेश असल्यानं राष्ट्रपतींनी तातडीनं स्वाक्षरी केली आहे.

या विधेयकानुसार 12 वर्षांच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल. तर 16 वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलीवर अत्याचार केल्यास आरोपीला 20 वर्षांची पोलीस कोठडी किंवा त्याला जन्मठेपही होऊ शकते.

कठोरातली कठोर शिक्षा

- आधी महिलांना बलात्कार करण्यास किमान 7 वर्ष सश्रम कारावास होता पण आताच्या विधेयकानुसार शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीची तरतूद केली आहे. शिक्षा जन्मठेपेपर्यंतदेखील वाढविता येऊ शकते.

- 16 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला किमान शिक्षा 10 वर्षांवरून 20 वर्षे करण्यात आली आहे. ही शिक्षा जन्मठेपेर्यंत वाढवण्यात येऊ शकते.

- 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल.

- 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार केल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल. गुन्हेगारांना किमान 20 वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल.

- 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल.

 

First published: April 22, 2018, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading