Home /News /national /

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा होणार पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे केला सत्तास्थापनेचा दावा

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा होणार पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे केला सत्तास्थापनेचा दावा

नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

    नवी दिल्ली, 25 मे : एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे समर्थन पत्र सोपवल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळेस राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आणि त्यांना शपथविधीची तारीख, वेळ आणि मंत्र्यांची यादी कळवण्याची सूचनादेखील केली. शनिवारी (25 मे) रात्री जवळपास 8.30 वाजण्याच्या सुमारास मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. दरम्यान, नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सरकार जलद गतीनं काम करणार - मोदी राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 'आमचं सरकार जलद गतीनं काम करणार. जनाधारासहीत जनतेच्या अपेक्षादेखील जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आमचं सरकार नवीन स्वरूपात काम करेल', असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. तसंच 'सत्तास्थापनेची तारीख निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा कोणत्या दिवशी घेण्यात येईल याबाबतची माहिती लगेचच राष्ट्रपतींनी दिली जाईल', अशीही माहिती मोदींनी यावेळेस दिली. NDAचा सत्तास्थापनेचा दावा NDAनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. शनिवारी (25 मे) रात्री जवळपास 8.30 वाजण्याच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सरकार स्थापनेचं समर्थन पत्र सोपवलं.  अमित शहा यांच्यासोबत शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, राजनाथ सिंह, नितीश कुमार, रामविलास पासवान, सुषमा स्वराज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, के पलानीस्वामी, कोनार्ड संगमा हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. 30 मे रोजी शपथविधी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं. आता 30 मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा असणार आहे. शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभारदेखील मानणार आहेत. नरेंद्र मोदींची NDAच्या नेतेपदी एकमतानं निवड एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय, 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्र मोदींच्या नावाला आपलं समर्थन दर्शवलं. शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासहीत एनडीएच्या घटक पक्षांनी आपलं समर्थनं दिलं. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना शुभेच्छा देखील दिल्या. SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी
    First published:

    Tags: President ramnath kovind

    पुढील बातम्या