नवी दिल्ली, 20 जून: संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संबोधित केले. या भाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या पुढच्या पाच वर्षाचा प्लॉन कसा असेल याची माहिती दिली. या भाषणादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपतींनी जवळपास एक तासाहून अधिक वेळ भाषण केले. या भाषणादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी पाहण्यात व्यस्त होते.
राष्ट्रपतींनी भाषण सुरु केल्यानंतर पहिली 24 मिनिटे राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी टाईप करत होते. त्यानंतर देखील त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्याऐवजी ते शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलत होते. एका बाजूला राष्ट्रपतींचे भाषण सुरु असताना राहुल गांधी मात्र मोबाईलची स्क्रिन पाहण्यात व्यस्त होते. राष्ट्रपतींचे भाषण अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बेंचला हात लावला. राष्ट्रपतींच्या भाषणाच्या पहिल्या 40 मिनिटात त्यांनी बेंच वाजवून अनुमोदन दिले नाही. राहुल गांधींनी भाषण संपण्यावेळी अखेरच्या काही सेंकदावेळी बेंच वाजवला. तर शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणा दरम्यान 6 वेळा बेंच वाजवला. 17 व्या लोकसभेत सर्वाधिक महिला खासदार निवडूण आल्या आहेत आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या उल्लेखावेळी सोनिया गांधी यांनी बेंच वाजवला. पण तेव्हा राहुल गांधी मात्र मोबाईलमध्ये बघत होते.
राष्ट्रपतींनी भाषणात जेव्हा सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. तेव्हा खासदारांनी सर्वाधिक वेळ बेंच वाजवला. तेव्हा सोनिया गांधींनी देखील बेंच वाजवला पण राहुल गांधी खाला पाहात शांत बसले होते. राष्ट्रपतींच्या भाषणा दरम्यान सोनिया गांधींनी अनेक वेळा राहुल गांधींकडे पाहिले पण ते तसेच मोबाईलमध्ये पाहत बसले होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चित्रासमोर फोटो काढत असताना राहुल गांधी अधिक उत्साही दिसत होते. त्यानंतर राहुल गांधींनी स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि ते फोटो आई सोनिया गांधी यांना दाखवण्यात ते व्यस्त दिसत होते. तेव्हा सोनिया यांनी त्यांनी इशाऱ्याने राष्ट्रपती भेटीसाठी येत असल्याचे सांगितले. जेव्हा राष्ट्रपती राहुल गांधींच्या जवळ पोहोचले तेव्हा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वत:हून नमस्कार करण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी हात पुढे करत त्यांना नमस्कार केला.
Congress President @RahulGandhi caught engrossed on his mobile while President Kovind’s speech is underway. Does he have any respect for anyone at all? pic.twitter.com/FsvmqgDnpD
— Know The Nation (@knowthenation) June 20, 2019
राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नारा यशस्वी करण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. नव्या सरकारच्या स्थापनेनंतरच्या या ऐतिहासिक कार्यक्रमावर संपूर्ण देशाचे लक्ष होते तेव्हा सर्वात पहिल्या बाकावर बसलेल्या राहुल गांधींचे लक्ष कुठे होते असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे त्यांची राजकीय समज कमी असल्याचे दिसून येते आणि ते स्वत:च्या भूमिकांशी गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याची टीका केली जात आहे.
VIDEO: प्यार के दुश्मन ! मुला-मुलीच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President