आजपासून जीएसटी लागू...

आजपासून जीएसटी लागू...

एक देश, एक कर या तत्वावर आधारित आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू झाला.

  • Share this:

30 जून : एक देश, एक कर या तत्वावर आधारित आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू झाला. बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीचा बझर दाबून जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

जीएसटीमुळे देशाच्या करप्रणालीत एक सुसूत्रता येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जीएसटी लागू करण्यात सर्व तत्कालीन सरकारांचं योगदान असल्याने कोणताही एक राजकीय पक्ष त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. जीएसटी लागू केल्याने 23 प्रकारचे टॅक्स एकाच फटक्यात मोडीत निघालेत.

जीएसटीच्या निमित्तानं देश आता आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. गीतामध्ये ज्याप्रमाणे 18 अध्याय आहेत त्याचप्रमाणे जीएसटी लागू करण्यासाठी 18 बैठका झाल्या. हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. याचाही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. तर जीएसटी लागू झाल्यानंतर आता एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच असेल, असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं.

या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अरुण जेटली उपस्थित होते.. त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, शरद पवार, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तसंच अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. काँग्रेस, आरजेडी आणि ममता बॅनर्जीने मात्र, या जीएसटीच्या या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 12:12 AM IST

ताज्या बातम्या