कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष पंतप्रधानांच्या शपथविधीला उपस्थित राहणार

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष पंतप्रधानांच्या शपथविधीला उपस्थित राहणार

ज्वेलरीतील आघाडीवरील कल्याण ज्वेलर्स हे आज राष्ट्रपती भवन येथे होत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधीमधील आमंत्रित अतिथींपैकी एक आहेत.

  • Share this:

त्रिसूर, 30 मे: ज्वेलरीतील आघाडीवरील कल्याण ज्वेलर्स हे आज राष्ट्रपती भवन येथे होत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधीमधील आमंत्रित अतिथींपैकी एक आहेत. आमंत्रण ह्या आठवड्याच्या सुरुवातीला आले आणि शपथविधीनंतर कुटुंबीय विशेष रात्रीभोजनालाही उपस्थित राहतील.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, टी. एस. कल्याणारमन हे पूर्वी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले आहेत. त्रिसूरमधील अशा एका बैठकीमध्ये श्री. कल्याणरमन ह्यांनी सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे: मिशन 2022 कार्यक्रम” साठी आपल्या सहकार्याचे आश्वसन दिले होते.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. टी. एस. कल्याणरमन, कार्यकारी संचालक राजेश आणि रमेश कल्याणरमन, कल्याण डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आर कार्थिक हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या