Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर; राष्ट्रपतींनी केलं नामांकित

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर; राष्ट्रपतींनी केलं नामांकित

रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिरासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे.

रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिरासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे.

रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिरासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

नवी दिल्ली, 16 मार्च : सर्वौच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी नामांकित केलं आहे. केंद्र सरकारने सायंकाळी उशिरा जारी केलेल्या पत्रकामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिरासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे.

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाल 13 महिन्यांचा राहिला. रंजन गोगोई हे 46 वे सरन्यायाधीश ठरले. 1978 साली वकिली सुरु करणाऱे गोगोई 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

पुढे वर्षभरात ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. या कार्यकाळात निवडणूक ते आरक्षण सुधारणा यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या निर्णय प्रक्रियेत रंजन गोगोई होते. रंजन गोगोई निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती झाली.

हेही वाचा-आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी!

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेले बोबडे हे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूरचे कुलपतीसुद्धा आहेत. याआधी ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 23 एप्रिल 2021 ला संपणार आहे.

First published:

Tags: President ramnath kovind, Rajya sabha