सुनील अरोडा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

सुनील अरोडा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून अरोडा यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सुनील अरोडा यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी ही नियुक्ती केली. अरोडा हे 2 डिसेंबरला मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. अरोडा यांची गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली होती.

सुनील अरोडा हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते या आधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. त्या आधी अरोडा यांनी अर्थ, वस्त्र आणि योजना आयोगात विविध पदावर काम केलं. 1999-2002 या कार्यकाळात ते विमान वाहतूक मंत्रालयात संयुक्त सचिव होते.

अरोरा पाच वर्ष इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक होते. त्यातल्या तीन वर्षात त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी होती. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून अरोडा यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी असेल. त्यासाठी निवडणुक आयोग कामाला लागले असून युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading