News18 Lokmat

राष्ट्रपतींना मिळतंय वरिष्ठ नोकरशहांहूनही कमी वेतन

सध्या राष्ट्रपतींना दीड लाख तर उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रूपये पगार मिळतो जो अनेक वरिष्ठ नोकरशहांहून कमी आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 09:30 AM IST

राष्ट्रपतींना मिळतंय वरिष्ठ नोकरशहांहूनही कमी वेतन

20 नोव्हेंबर: राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना अजूनही वरिष्ठ नोकरशहांपेक्षा कमी वेतन मिळतं आहे अशी माहिती समोर आली आहे.सध्या राष्ट्रपतींना दीड लाख तर उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रूपये पगार मिळतो जो अनेक वरिष्ठ नोकरशहांहून कमी आहे.

राष्ट्रपती हे तिन्ही लष्करी सेवांचे प्रमुख असतात पण प्रत्येक लष्करी सेवेच्या अध्यक्षाहूनही कमी पगार आज राष्ट्रपतींना मिळतो आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची दोन वर्षांपूर्वी अंमलबजावणी झाल्यानंतर निर्माण झालेली तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कायदा दुरुस्ती अद्याप न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला होता.

त्यानुसार राष्ट्रपतींचा पगार 5 लाख करण्यात यावा अशी मागणी या प्रस्तावामध्ये केली आहे. तो वर्षभरापूर्वीच कॅबिनेट सचिवालयाकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता,अशी माहिती गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

2008 साली राष्ट्रपतींची पगारवाढ झाली होती. तोपर्यंत राष्ट्रपतींना 50,000 रूपयेच पगार मिळत होता. या सोबत आधीच्या राष्ट्रपतींचे पेन्शन वाढवण्याचाही केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.

Loading...

तेव्हा आता राष्ट्रपतींची पगारवाढ कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...