राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरोधात विरोधकांची महाआघाडी, सोनिया गांधी अध्यक्षा ?

राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरोधात विरोधकांची महाआघाडी, सोनिया गांधी अध्यक्षा ?

भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन होण्याची शक्यता असून सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे निमंत्रक राहणार आहेत

  • Share this:

27 एप्रिल : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधीपक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन होण्याची शक्यता असून सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे निमंत्रक राहणार आहेत.

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोर्चेबांधणीला सुरुवात झालीये. विरोधक भाजपच्या विरोधात एकाच छता खाली येतायत. कालच राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राष्ट्रपतीपदाची चर्चा झाल्याचं कळतंय.  पवारांच्या भेटीच्या आधी नितीशकुमार, सिताराम येचुरी, डी. राजा. यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनियांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत चर्चा केली होती. त्यामुळे सर्व विरोधीपक्ष भाजप विरोधात एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालीये.

विशेष म्हणजे डावे पक्ष पवारांच्या नावासाठी आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांनी सर्वसंमतीनं एक नाव द्यावं अशी खेळी खेळलीय.

दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनीही पवारांच्या नावाला पसंती दाखवलीय. भागवतांच्या नावाचा आग्रह धरणारी शिवसेना पवारांबद्दल मात्र मोदींच्या मैत्रीचा दाखला देतेय.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक उमेदवार दिला तर ते उमेदवार पवार असावेत असे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश मिळतं का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 10:54 PM IST

ताज्या बातम्या