मराठी बातम्या /बातम्या /देश /अमेरिकेच्या निवडणुकीतही मोदी...मोदी! ट्रम्प यांच्या प्रचार VIDEOमध्ये पंतप्रधान

अमेरिकेच्या निवडणुकीतही मोदी...मोदी! ट्रम्प यांच्या प्रचार VIDEOमध्ये पंतप्रधान

अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. राजकारणाबाबत ते अतिशय जागरुक असल्याने सगळेच पक्ष भारतीयांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करतात.

अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. राजकारणाबाबत ते अतिशय जागरुक असल्याने सगळेच पक्ष भारतीयांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करतात.

अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. राजकारणाबाबत ते अतिशय जागरुक असल्याने सगळेच पक्ष भारतीयांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करतात.

नवी दिल्ली 09 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची (PM Narendra Modi Speech) आणि निवडणूक प्रचाराची एक खास स्टाईल आहे. जगभर त्याची चर्चा होत असते. अमेरिकेच्या निवडणूक प्रचारातही आता मोदीचं नाव घेतलं जातं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या निवडणूक प्रचारासाठी  (US Election campaign)तयार केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतल्या भारतीयांची मनं वळविण्यासाठी हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.

अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. राजकारणाबाबत ते अतिशय जागरुक असल्याने सगळेच पक्ष भारतीयांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. ट्रम्प यांनी या आधीच्या निवडणुकीतही सबका साथ, सबका विकासचा नारा दिला होता.

या प्रचार व्हिडीओची सुरुवातच मोदींच्या भाषणापासून होते. ह्युस्टन इथं झालेल्या मोंदींच्या सभेच्या कार्यक्रमाच्या व्हिडीओपासून याची सुरुवात होते. त्यात मोदींनी ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे. या कार्यक्रमात 50 हजार अनिवासी भारतीयांनी सहभाग घेतला होता.

आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष ट्रम्प सहकुटुंब उपस्थित होते. त्याचा आधार घेत हा व्हिडीओ तयार केला आहे. या आधी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ तयार करत भारतीयांची मनं जिंकण्यांचा प्रयत्न केला होता.

" isDesktop="true" id="478497" >

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या स्थितीमुळे सर्व जगाचं लक्ष त्याकडे लागलं आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. ट्रम्प यांनीही पूर्ण जोर या निवडणुकीत लावला असून प्रचाराचा धडाकाही सुरू केला आहे.

पहिल्या निवडणुकीत मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा त्यांनी दिली होती. आताही ते राष्ट्रवादाला हात घालण्याची शक्यता आहे. तर प्रसार माध्यमातल्या मोठ्या गटाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

First published:

Tags: Donald Trump, Narendra modi