महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

आज महात्मा जोतिराव फुले यांची जयंती. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला.

  • Share this:

11 एप्रिल : आज महात्मा जोतिराव फुले यांची जयंती. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते, विधवा विवाहांना प्रोत्साहन, बालविवाहाला विरोध अशा त्यांच्या योगदानानं पुढच्या सगळ्या पिढ्यांचं आयुष्य सुकर झालं.

त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी ट्विट करून आदरांजली वाहिली. राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलंय, फुले आदर्श राष्ट्र निर्माता होते. आपल्यासाठी ते एक प्रेरणा स्रोत्र आहेत.

तर पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहात म्हटलंय, त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे लोकांना मदत मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 01:39 PM IST

ताज्या बातम्या