मराठी बातम्या /बातम्या /देश /

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या हत्यारांना फाशी देण्यासाठी ट्रायल झालं, कारण...!

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या हत्यारांना फाशी देण्यासाठी ट्रायल झालं, कारण...!

16 डिसेंबरला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे.

16 डिसेंबरला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे.

16 डिसेंबरला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 10 डिसेंबर : निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Case) प्रकरणी दोषींपैकी एकाला मंडावलीहून तिहार कारागृहात हलविण्यात आले आहे. जिथे इतर गुन्हेगार तुरुंगवास भोगत आहेत. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांचा माफीचा अर्ज नाकारल्यानंतर सर्व दोषींना लवकरच फासावर लटकविण्याची शक्यता आहे. त्यांना फाशीवर चढवण्याची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. 16 डिसेंबरला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी डमी ट्रायलही करण्यात आलं आहे. मात्र, आरोपींना फाशी देण्याचे अद्याप जेल प्रशासनाकडे पत्र आलेले नाही. निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिहारमधील दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आलं. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, तिहार जेल प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरून चाचणी घेतली. याचा हेतू असा होता की, जर दोषींना फाशी देण्यात आली तर लटकवलेली विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटेल का? इतर बातम्या - BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक फाशी देण्यासाठी जो दोर दोरखंड लागतो तो करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. देशात अतिशय मोजक्याच ठिकाणी हा दोरखंड तयार केला जातो. बिहारच्या बक्सर कारागृहात यासाठी दोरखंड तयार करण्याचं काम सुरू आहे. फाशीला लागणारे 10 दोरखंड तयार करण्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे. त्याचा वापर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी केला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय. इतर बातम्या - धक्कादायक! शिर्डीमध्ये आईसह 3 मुलांना विषबाधा, चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू तिहार जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फाशी देण्यासाठीचे दोरखंड हे बस्करवरून मागवले जाणार नाहीत. तर तिहारमध्ये 5 दोरखंड आहेत. पण तरीदेखील आम्ही बक्सर प्रशासनाशी चर्चा करत आहोत. फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बंगालवरून फाशी देणारा बोलावण्यात येऊ शकतो. तिहार जेलच्या नंबर 3मध्ये फाशी देण्याची जागा आहे. कोण कैदी कुठे आहे बंद निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांपैकी एक पवन याला मंडोली जेल क्रमांक -14 मधून तिहार जेल नंबर -2 मध्ये हलविण्यात आले आहे. यात अक्षय आणि मुकेशही बंद आहेत. विनय शर्मा तुरूंग क्रमांक -4 मध्ये आहे. इतर बातम्या - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या