महिलांनी गर्भवतीला खांद्यावरुन नेले रुग्णालयात, 8 तास 18 मिनिटांचा ह्रदयाचा ठोका चुकवणारा प्रवास

महिलांनी गर्भवतीला खांद्यावरुन नेले रुग्णालयात, 8 तास 18 मिनिटांचा ह्रदयाचा ठोका चुकवणारा प्रवास

तब्बल 18 किमीपर्यंत गर्भवतीला खुर्चीवर बसवून ती खुर्ची खांद्यावर घेऊन महिला चालत जात होत्या.

  • Share this:

कुल्लू, 17 फेब्रुवारी : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आरोग्य (Health) आणि रस्ते सुविधांचा अभाव आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की रुग्णांना खांद्यावरुन रुग्णालयापर्य़ंत पोहोचविले जाते. तेथील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. रस्ते सुविधा नसल्याने तेथे लोक पायीच प्रवास करतात. मात्र आपात्कालिन परिस्थिती असल्यास तेथील रहिवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यातही गावांमध्ये कोणी आजारी रप राज्यात दुर्गम भागातील परिस्थिती वाईट आहे. ही घटना हिमाचलातील कुल्लू जिल्ह्यातील आहेत. तब्बल 18 किमीपर्यंत गर्भवतीला (Pregnant) खुर्चीवर बसवून ती खुर्ची खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचविण्यात आले. हा 8 तासांचा प्रवास अंगावर काटा आणणारा होता. गर्भवतीला खूप सावधानतेने खाद्यांवर घेतले. त्यानंतरही रस्ता वर-खाली होता. त्यामुळे गर्भवतीला धक्के लागू नये यासाठी महिलांनी खूप काळजी घेतली. 8 तासांच्या प्रवासानंतर तिला मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आलं. तेथील गर्भवतीला रुग्णालयात हलविले.

महिलांनी खांद्यावर उचलले

मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील सैंज घाटातील अतिदूर्गम भागात पाडारली पंचायतीतील शाकटी, मरौड आणि शुगाडमध्ये स्वातंत्र्यानंतर 72 वर्षानंतरही रस्ते मिळू शकलेले नाहीत. गावातील गर्भवती (27) सुनीता हिला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी गावातील महिलांनी आधी खुर्चीला बांधलं त्यानंतर ती खुर्ची खांद्यावर उचलून तब्बल 8 तासांचा प्रवास केला.

सकाळी गर्भकळा सुरू झाल्या

रविवारी सकाळी गर्भवती सुनीला हिला गर्भकळा सुरू झाल्यानंतर कुटुंबातील सदस्या चिंतेत होते. यादरम्यान त्यांनी गावकऱ्यांकडून मदत मागितली. लोकांनी खुर्चीला बांबू बांधले. गर्भवतीला खांद्यावर घेतले आणि रुग्णालय़ाच्या मार्गाने चालू लागले. सरकारने दुर्गम भागात विकासकामे करावीत. येथे रस्ते नाहीत. त्यामुळे आपात्कालिनक परिस्थितीत गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. यापूर्वीदेखील या भागातील रुग्णांना अशाच प्रकारे खाद्यांवर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणले जाते. येथे अनेक सरकारे आली आणि गेलीत मात्र कोणीच या गावातील रस्ते बांधणीसाठी काम केलं नसल्याची परिस्थिती या भागातील महिलांनी व्यक्त केली आहे.

First published: February 17, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या