रायपूर, 25 मे : कोरोनामुळं देशातील स्थिती (Corona in India) गंभीर आहे. अनेक कुटुंब कोरोनामुळं उद्ध्वस्त झाली आहेत. कोरोना काळातही रुग्णांची सेवा करत राहिलेल्या एका गर्भवती नर्सचा (Pregnant Nurse died to corona) अखेर मृत्यू झाला. परिसरात तिनं केलेल्या कामाचं कौतुक होत असलं तरी नवजात बालकाची आई कायमची हरपली असल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सर्वजण नवजात बालकाच्या काळजीनं हळहळ व्यक्त करत आहेत.
बाळाला जन्म दिल्यानंतर दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवानं बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं मात्र ते या नर्सला आईला वाचवू शकले नाहीत. नर्स म्हणून ती शेवटपर्यंत काम करत राहिली, पण तिलाच या भीषण कोरोनानं अखरे गाठलं. छत्तीसगडच्या कवर्धा ब्लॉकमधील लिमो गावात हा प्रकार घडला आहे.
गरोदर काळातही करत होती नर्सचं काम
नर्सचे पती भेष कुमार बंजारे यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी प्रभा गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत राहिली. ती कवर्धा ब्लॉकच्या ग्रामीण लिमो येथे राहत होती, तर तिची पोस्टिंग प्राथमिक आरोग्य केंद्र खैरवार खुर्द लोरमी (मुंगेली) येथे होती. गरोदरपणासाठी ती कपडाह या गावी भाड्याच्या खोलीत एकटीच राहत होती आणि तेथूनच दवाखान्यात येत-जात असे.
हे वाचा - भावोजीसोबत पत्नीनं केलेल्या त्या कृत्यामुळे पतीला बसला धक्का, उचललं टोकाचं पाऊल
प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर प्रभाला 30 एप्रिल रोजी कवर्धा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे भेषकुमार यांनी सांगितले. सिझेरियन ऑपरेशनद्वारे तिनं एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयात असताना तिला बर्याच वेळा ताप आला होता. तिला रुग्णालयामधून घरी आणण्यात आल्यानंतर अजूनच त्रास वाढत गेला, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर तिची अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर तिला कवर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, ऑक्सिजनची पातळी कमी होत गेल्यानं तिला रायपूरला हलवण्यात आलं, परंतु 21 मे रोजी तिचा मृत्यू झाला.
ती सुट्टी घ्यायला तयार नव्हती
नवऱ्यानं सांगितलं की, आपण प्रभाला बर्याच वेळा सुटी घेण्यास सांगितले, पण ती तयार नव्हती. ती म्हणायची मी घरात बसून काय करणार? त्यापेक्षा मी काम करत राहिलेलं चांगलं आहे. तिनं गरोदरपणातही संपूर्ण 9 महिने रुग्णालयात काम केलं. जेव्हा प्रसूती वेदना वाढल्या आणि सामान्य प्रसूती होत नव्हती तेव्हा तिला सिझेरियन प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या धरसीनवा येथे राहणार्या प्रभाचे जून 2020 मध्ये लिमोचे रहिवासी भेषकुमारसोबत लग्न झाले होते. लग्नावेळीही लॉकडाउन होता, त्या दोघांनीही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत लग्न केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Corona updates, Corona virus in india, Coronavirus