बाळासाहेबांना 'भारतरत्न' द्या! मोदींच्या राम मंदिराच्या घोषणेनंतर तोगडियांचा एल्गार

बाळासाहेबांना 'भारतरत्न' द्या! मोदींच्या राम मंदिराच्या घोषणेनंतर तोगडियांचा एल्गार

राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदुऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करून तोगडीयांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

नागपूर,05 फेब्रुवारी : प्रखर हिंदुत्वावादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यावरून देशात राजकारण पेटलेलं असतानाच आता हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी समोर आली आहे. कडवे हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात ही मागणी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीची महत्वाची घोषणा केली. त्यामुळे राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करून तोगडियांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

देशात गेली अनेक वर्ष धगधगणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या वादासंदर्भात सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिला. त्यातून अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग अखेर मोकळा झाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजाणी करणार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारण्यासाठीच्या ट्रस्टची लोकसभेत घोषणा केली. त्यामुळे राम मंदिराच्या आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या हिंदूऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारत सरकारनं भारतरत्न द्यावा अशी मागणी प्रवीण तोगडीया यांनी केलीय.

हे वाचा - आता मनसेचंही 'जय श्रीराम', राज ठाकरेंनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी आणि हिंदुस्थानशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनीच राम मंदिर आंदोलनाला नेतृत्व दिलं आणि हिंदू नवचेतना जागवली. त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी तोगडीयांनी केलीय.

तोगडीया यांच्या या मागणीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध आहे.

अमिताभ यांनी केली होती भारतरत्नची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कारावे, अशी मागणी याआधी महानायक अमिताभ बच्चन यांनीही केली होती. शिवाय शिवसैनिकांनी अनेकदा बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरली आहे.

अन्य बातम्या

ही लढाई आहे.. मनसेच्या महामोर्चाची जोरदार तयारी, पाहा पहिला टिझर..

शिवजयंतीवरून वाद, विनायक मेटे यांचा शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर दिशा पाटनीनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली

First published: February 5, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading